शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील २१ शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची माहिती रखडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 13:28 IST

अतिरिक्त शिक्षक, आरक्षण, विषय, पटसंख्या आदी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे; परंतु जिल्ह्यातील २१ शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची माहिती रखडली आहे.

ठळक मुद्देमराठी शाळांमधील ६३ आणि अल्पसंख्याक शाळांमधील ६३ अशा एकूण १२६ अतिरिक्त शिक्षकांची नावे आली आहेत. उर्वरित शाळांची अतिरिक्त शिक्षकांची नावे अद्याप आली नाहीत.

अकोला: २0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार समायोजनाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाळांकडून अतिरिक्त शिक्षक, आरक्षण, विषय, पटसंख्या आदी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे; परंतु जिल्ह्यातील २१ शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची माहिती रखडली आहे. यामागे शिक्षक आणि शिक्षण संस्थाचालकांमधील वाद असल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची माहिती त्यांच्याकडून मिळाली नाही.माध्यमिक शिक्षण विभागाने ३४७ पैकी ३३२ शाळांची संचमान्यता पूर्ण केली आहे. शाळांना रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षक, आरक्षण, विषय आदींची माहिती मागविली असून, सध्या शिक्षण विभागाकडे मराठी शाळांमधील ६३ आणि अल्पसंख्याक शाळांमधील ६३ अशा एकूण १२६ अतिरिक्त शिक्षकांची नावे आली आहेत. उर्वरित शाळांची अतिरिक्त शिक्षकांची नावे अद्याप आली नाहीत. यामागे शिक्षक- शिक्षण संस्थांमधील सुरू असलेले वाद आहेत. अनेक शिक्षण संस्थांमध्ये सेवा ज्येष्ठता डावलून शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात येत आहेत. संस्थाचालकांच्या जवळच्या आणि पदाने कनिष्ठ असलेल्या शिक्षकांना मात्र जाणीवपूर्वक अतिरिक्त शिक्षकांच्या यादीतून बाजूला काढण्यात येत असल्याने, याठिकाणी शिक्षक आणि संस्थाचालकांमध्ये वाद सुरू झाले आहेत. हे वाद बाजूला सारून शिक्षणसंस्थांनी त्यांच्याकडील अतिरिक्त शिक्षकांच्या नावांची यादी, आरक्षण, विषय आणि पटसंख्या याची माहिती माध्यमिक शिक्षक विभागाला सादर करण्याचे सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत; परंतु शिक्षणसंस्था याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहेत. या शिक्षणसंस्थांकडून माहिती आल्यास यंदा १६0 च्या जवळपास अतिरिक्त शिक्षकांची संख्या जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणSchoolशाळा