महागाईचा फटका घर बांधकामांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:19 IST2021-03-17T04:19:40+5:302021-03-17T04:19:40+5:30
अकोला : नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव गगनाला भिडले आहे. यामुळे अनेकांचे घर बांधकामाचे आर्थिक बजेड कोलमडणार ...

महागाईचा फटका घर बांधकामांना
अकोला : नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव गगनाला भिडले आहे. यामुळे अनेकांचे घर बांधकामाचे आर्थिक बजेड कोलमडणार आहे. त्यात इंधन दरवाढीने आणखी भर टाकली आहे. इंधनाचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्चही वाढला. पर्यायाने वाहतूक साहित्याच्या किंमतीत वाढ झाली.--------------------------------------------------
एसटी आगारात सोशल डिस्टन्सिंगचा अभाव
अकोला : शहरातील मध्यवर्तीय एसटी आगारात प्रवाश्यांच्या बसण्यासाठी सिमेंट बाकांची सोय केली आहे. कोरोना काळात सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी या बाकांवर जागा सोडून बसण्यासाठी रंगाच्या सहाय्याने चिन्ह काढण्यात आले; मात्र या नियमांचे पालक करताना कोणी दिसून येत नाही. प्रवाशी एकच गर्दी करत आहेत.
-----------------------------------------------------
धूळीने वाहनधारक त्रस्त
अकोला : शहरातील नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाखालच्या रस्त्यावरुन जाताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहे. ही धूळ डोळ्यांमध्ये जात असल्याने वाहनाचा तोल जावून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावरुन जाताना काळजी घेणे गरजेचे आहे.