उद्योगांना मिळणार शिवणी रेल्वेस्थानकाची ‘कनेक्टिव्हिटी’!
By Admin | Updated: March 17, 2016 02:30 IST2016-03-17T02:30:28+5:302016-03-17T02:30:28+5:30
मार्ग निर्मितीचे कार्य प्रगतिपथावर.

उद्योगांना मिळणार शिवणी रेल्वेस्थानकाची ‘कनेक्टिव्हिटी’!
राम देशपांडे /अकोला
औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना लवकरच दक्षिण मध्य रेल्वेच्या शिवणी रेल्वे स्थानकाची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. बी.के. चौकातून पुढे नोबेल ग्रेन कंपनीपर्यंत जाणार्या ३९0 मीटर मार्गाचे व रेल्वे स्थानकाच्या मालधक्कय़ापर्यंंत जाणार्या ९७७ मीटर मार्गाचे काम रखडले होते. अलीकडेच एमआयडीस प्रशासनानाने या दोन मार्गांंच्या पूर्णत्वासाठी युद्धस्तरावर कार्य सुरू केले असून, लवकरच या दोन्ही मार्गांंच्या डांबरीकरणाला प्रारंभ होणार आहे. या कामासाठी प्रस्तावित ७९.७६ लाखांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती एमआयडीसीचे वरिष्ठ अभियंता एस.एस. कुर्हाडे यांनी लोकमतला दिली.
अकोला औद्योगिक वसाहतीच्या दक्षिणेस शिवणी रेल्वे स्थानक तथा मालधक्का आहे. औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना रेल्वे मालधक्कय़ाचा आणि दक्षिण रेल्वे मार्गाचा वाणिज्यिक लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने युद्धस्तरावर काम हाती घेतले आहे. अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीतील बहुतांश मार्गांंचे डांबरीकरण करण्यात आले असले तरी गेल्या अनेक वर्षांंपासून बी.के. चौकातून पुढे नोबेल ग्रेन कंपनीपर्यंंत जाणार्या ३९0 मीटर मार्गाचे व रेल्वेस्थानकाच्या मालधक्कय़ापर्यंंत जाणार्या ९७७ मीटर मार्गाचे काम रखडले होते. उद्योजकांना मालधक्कय़ापर्यंंत पोहचविणार्या दोन्ही मार्गांंचे अलीकडेच मुरुम टाकून सपाटीकरण करण्यात आले. येत्या आठ दिवसांत या मार्गांंच्या डांबरीकरणालादेखील सुरुवात होत असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. या दोन्ही मार्गांंंच्या डांबरीकरणानंतर शिवणी रेल्वे स्थानक आणि त्यालगतचा मालधक्का हा थेट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील विमानतळास जोडला जाणार आहे.