शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

कृषी, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात औद्योगिक विकास साधावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 13:36 IST

अकोला: कृषी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये औद्योगिक विकास विषयावर दोन दिवसीय पहिल्या आंतरराष्टÑीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांच्या हस्ते झाले.

अकोला: कृषी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये औद्योगिक विकास विषयावर दोन दिवसीय पहिल्या आंतरराष्टÑीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांच्या हस्ते झाले. अक्षय ऊर्जेचा वापर करू न शेती, उद्योग व्यवसाय निर्मितीवर येथे तज्ज्ञांचा सूर उमटला.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित परिषदेत इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे अध्यक्ष प्रा. इंद्रमणी, नवी दिल्ली यांनी ऊर्जा क्षेत्रात उद्योग निर्मिती व रोजगाराच्या संधी निर्माण करणे, ही देशापुढची महत्त्वाची गरज असल्याने त्यादृष्टीने काम करावे लागणार आहे. यानुषंगाने निवडलेला आंतरराष्टÑीय परिषदेचा विषय दिशा देणारा ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. राष्टÑीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे राष्टÑीय समन्वयक डॉ. आर. बी. शर्मा यांनी आंतरराष्टÑीय परिषद विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी नव्हे, उद्योगासाठी नवी दिशा देणारे उद्योजक होण्यासाठी मानसिक विकास घडविणारी ठरत असल्याने परिषदांचे आयोजन करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. या माध्यमातून पुढील काळात विद्यार्थ्यांमधूनच उद्योजक निर्माण होतील, असा आशावाद व्यक्त करताना, कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाद्वारे कमी कालावधीत या पद्धतीचे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी ऊर्जा व औद्योगिक विकास यावर विचार मांडले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. धवन यांनी ही कृषी, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात औद्योगिक विकास साधून विद्यार्थ्यांमधून उद्योजक निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे व या परिषदेचे आयोजक तथा प्रमुख अन्वेषक डॉ. एस. आर. काळबांडे यांनी परिषद घेण्यामागील उद्देश समजावून सांगितला. राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पात कर्मचारी तथा विद्यार्थ्यांच्या क्षमता बांधणी व कौशल्य विकास यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे सांगितले. या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रातील व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील औद्योगिक विकासावर जागृती करण्यात येत असल्याचे नमूद केले. परिषदेला नवी दिल्लीचे राहुल श्रीवास्तव, गुजरातचे डॉ. रामकिशोर सिंह, हैदराबादचे विजय नदीमती, ओमान येथील डॉ. पंकज पाथे्र यांची उपस्थिती होती.परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आभार प्रा. विवेक खांबलकर यांनी मानले. प्रा. धीरज कराळे व कर्मचाऱ्यांनी परिषदेसाठी सहकार्य केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ