श्रीविष्णू तोष्णीवाल २0-२0 क्रिकेट स्पर्धेत इंदूर संघ १0 धावांनी विजयी
By Admin | Updated: January 17, 2015 00:01 IST2015-01-17T00:01:23+5:302015-01-17T00:01:23+5:30
अकोला येथील श्रीविष्णू तोष्णीवान क्रि केट स्पर्धेत सरगुजा व नागपूर संघाचा सामना बरोबरीत.

श्रीविष्णू तोष्णीवाल २0-२0 क्रिकेट स्पर्धेत इंदूर संघ १0 धावांनी विजयी
अकोला : अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर श्रीविष्णू तोष्णीवाल ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत सहाव्या दिवशी रोमहर्षक सामने बघायला मिळाले. सरगुजा एलिट व नागपूरचा रूबी स्पोर्टिंग क्लब या दोन बलाढय़ संघांमध्ये झालेला सामना बरोबरीत सुटला, तर इंदूर संघाने एआयआर नागपूरचा १0 धावांनी निसटता पराभव केला.
शुक्रवारी सकाळच्या सत्रात सरगुजा व नागपूर संघात सामना झाला. सरगुजा संघाने प्रथम फलंदाजी करीत २0 षटकांत ९ बाद १२७ धावांचे लक्ष्य नागपूर संघासमोर ठेवले होते. मनोज सिंग याने २७, तर संजय आणि अनुश्री यांच्या प्रत्येकी २२ धावांच्या बळावर सरगुजा संघाला माफक धावसंख्या उभारता आली. नागपूर संघाकडून सुमन यादव, तुलशी खोब्रागडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. आनंद श्यामशेरिया आणि नीलेश बन्सोड प्रत्येकी १ गडी टिपण्यात यशस्वी झाले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नागपूर संघ ७ गडी गमावून २0 षटकांत १२७ धावाच काढू शकला. यामुळे सामना बरोबरीत सुटला. मिथिलेश गुनेरियाच्या दमदार ४५ धावा आणि प्रज्वल बनिया याच्या २५ धावांनी नागपूर संघाला विजयासमीप नेले, मात्र अतुल वानखडेच्या १९ धावांव्यतिरिक्त अन्य फलंदाज फारशी कामगिरी करू शकले नाहीत. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्याचा रोमांच उपस्थित प्रेक्षकांनी पुरेपूर अनुभवला. सरगुजा संघाकडून कुलप्रीत, नमन व समद यांनी प्रत्येकी २ गडी टिपले. नितेश व रवि यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. मिथिलेश गुनेरिया याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.