इंदूर येथून आणत होते गर्भपाताचा गोळय़ा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 20:33 IST2017-03-29T20:33:11+5:302017-03-29T20:33:11+5:30
एका महिलेला गर्भपाताच्या गोळय़ा विकताना पीसीपीएनडीटी पथकाने दोघा आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

इंदूर येथून आणत होते गर्भपाताचा गोळय़ा!
गर्भपात गोळय़ा प्रकरणाचा तपास : रामदास पेठ पोलीस इंदूरमध्ये दाखल अकोला : एका महिलेला गर्भपाताच्या गोळय़ा विकताना पीसीपीएनडीटी पथकाने दोघा आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपी आरोग्य सहायक सुनील निचळ व गजानन ढोपे यांनी इंदूर येथून गर्भपाताच्या गोळय़ा आणून त्याची विक्री करीत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी ढोपे याला घेऊन इंदूर येथील दुकान गाठले. या प्रकरणात इंदूर येथील वैद्यकीय व्यावसायिकाससुद्धा पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. गर्भपाताच्या गोळ्या विकल्या जात असल्याच्या माहितीवरून पीसीपीएनडीटी पथकाने रामदास पेठ पोलिसांच्या मदतीने सुनील निचळ (रा. भारती प्लॉट) यास एका महिलेला पाच हजार रुपयांत गर्भपाताच्या गोळ्या विकत असताना रंगेहात पकडले होते. रामदास पेठ पोलिसांनी त्यास अटक केली. त्याच्या चौकशीतून त्याने सहकारी गजानन ढोपे (रणपिसेनगर) याचे नाव सांगितल्यावर पोलिसांनी ढोपे याला अटक केली. आरोपींना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आरोपींची पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांनी, इंदूर येथील एका वैद्यकीय व्यावसायिकाकडून आम्ही गर्भपाताच्या गोळय़ा आणून अकोल्यात विकत होतो. अशी माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना घेऊन बुधवारी इंदूर गाठले. या ठिकाणी पोलीस वैद्यकीय व्यावसायिकाला ताब्यात घेऊन चौकशीसाठी अकोल्यात आणण्याची शक्यता आहे. इंदूर येथील वैद्यकीय व्यावसायिकाचा जबाब पोलीस नोंदविणार आहेत. (प्रतिनिधी)