इंदिरानगरवासीयांना लवकरच मिळणार जागेचा मालकी हक्क!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:20 IST2021-04-23T04:20:10+5:302021-04-23T04:20:10+5:30
इंदिरा नगरातील झोपडपट्टीतील जागा नावावर होण्याकरिता म्हणजेच, सध्या असेसमेंटमध्ये मालक म्हणून शासन व भोगवटदार आहे. ज्याला जागा मिळाली त्यांची ...

इंदिरानगरवासीयांना लवकरच मिळणार जागेचा मालकी हक्क!
इंदिरा नगरातील झोपडपट्टीतील जागा नावावर होण्याकरिता म्हणजेच, सध्या असेसमेंटमध्ये मालक म्हणून शासन व भोगवटदार आहे. ज्याला जागा मिळाली त्यांची नावे आहेत. आता इंदिरानगरमधील सध्याच्या स्थितीत राहत असलेल्या नागरिकांच्या नावावर जागा होण्याकरिता प्रक्रिया सुरू झाली आहे. नगर परिषदेने २४ एप्रिलला ७,०६,५०० रुपयांचा भरणा डेप्यूटी एसएलआर भूमी अभिलेख कार्यालयाकडे केला. न.प.ने सदर निधीची तरतूद १५ व्या वित्त आयोग निधीमधून केली. आता थोड्याच दिवसात एसएलआर कडून न.प.ला इंदिरा आवासचे मोजणी शिट नकाशे मिळणार असून, इंदिरा नगरमधील नागरिकांना जागांचा मालकी हक्क मिळणार आहे.
इंदिरानगरमधील नागरिकांना जागेचा मालकी हक्क देण्याची प्रक्रिया नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, आ. प्रकाश भारसाकडे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आ.रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती.