देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:33 IST2021-03-04T04:33:47+5:302021-03-04T04:33:47+5:30

पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंमवाडी बस स्थानक परिसरात गुन्हा करण्याच्या ...

Indigenous man with pistol arrested | देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा अटकेत

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा अटकेत

पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंमवाडी बस स्थानक परिसरात गुन्हा करण्याच्या उद्देशाने देशी बनावटीची पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या युवकास दहशतवादविरोधी कक्षाने बुधवारी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.

जुने शहरातील भगतवाडी येथील रहिवासी हमीद खान राशिद खान हा कुख्यात आरोपी असून तो गुन्हा करण्याच्या उद्देशाने देशी बनावटीची पिस्तूल घेऊन निमवाडी परिसरात फिरत असल्याची माहिती दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरुन पाटील यांनी सापळा रचून हामिद खान राशिद खान यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेत एक देशी बनावटीचे पिस्तूल पोलिसांना आढळले पोलिसांनी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. तो चोरी करण्याच्या उद्देशाने हे शस्त्र बाळगून असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Indigenous man with pistol arrested