स्वतंत्र विदर्भासाठी जनता अनुकूल!

By Admin | Updated: July 29, 2014 20:35 IST2014-07-29T20:35:23+5:302014-07-29T20:35:23+5:30

क्रांतिदिनी प्रत्येकाच्या हाताला बांधणार ‘विदर्भ बंध’ - शरद पाटील

Independent Vidarbha people favorable! | स्वतंत्र विदर्भासाठी जनता अनुकूल!

स्वतंत्र विदर्भासाठी जनता अनुकूल!

अकोला : स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने कधी नव्हे एवढे जनमत एकवटले असून, या मागणीसाठी उभारलेल्या लढय़ाला विदर्भातील जनतेचा, तसेच राजकीय पक्षांचाही पाठिंबा आहे. हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी व विदर्भ अस्मिता जागविण्यासाठी, येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी विदर्भातील जनतेच्या हाताला 'विदर्भ बंध' बांधणार असल्याची माहिती, जनमंच या सामाजिक संघटनेचे नेते शरद पाटील यांनी लोकमतशी बातचित करताना दिली. पाटील
प्रश्न- स्वतंत्र विदर्भासाठी आतापर्यंतचे लढे अयशस्वी झाले. हा लढा तरी यशस्वी होईल का?
-आजपर्यंतचे लढे अयशस्वी झाले याबद्द्ल दुमत नाही; परंतु यावेळी जनमंचच्या लढय़ाला विदर्भातील प्रत्येकाचा पाठिंबा आहे. हा लढा जनतेतून उभा झाला आहे. जनमंचने विदर्भात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर घेतलेल्या जनमत चाचणीत, सहा लाख मतदारांनी स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने कौल दिला.
प्रश्न- वेगळ्य़ा विदर्भाला शिवसेनेचा तर विरोध आहे?
- असो ना! भारतीय जनता पक्ष मात्र विदर्भाच्या बाजूने आहे, भाजपने भुवनेश्‍वरला झालेल्या त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव यापूर्वीच पारित केलेला आहे. छोटी राज्य असली तर त्या राज्याचा विकास साधता येतो. म्हणूनच भाजपाने छत्तीसगड, उत्तराचंल, झारखंड या छोट्या राज्यांची निर्मिती केली आहे. आता केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाला कोणतीच अडचण येणार नाही.
प्रश्न- एखादे राज्य वेगळे करण्यासाठी त्यास राज्य शासनाची अनुमती नको का?
- हा गैरसमज म्हणावा लागेल. स्वतंत्र तेलंगण झाले तेव्हा कुठे आंध्र प्रदेश सरकारला विचारले होते. स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्याचे सर्व अधिकार हे केंद्र सरकारला असतात. ज्या राज्याचे विभाजन करायचे आहे, त्या राज्य सरकारला केवळ या संदर्भातील प्रस्ताव पाठवून मत मागविले जाते.
प्रश्न - आंदोलनाचे पुढील स्वरू प काय ?
- स्वतंत्र विदर्भासाठी जनतेच्या भावनाच तीव्र आहेत. याबाबत प्रचंड आत्मविश्‍वास आहे. म्हणूनच, या अनुकूलतेला अधिक गती देण्यासाठी आम्ही विदर्भव्यापी दौरे आयोजित केले असून, विदर्भाचा वसाहत म्हणून कसा वापर केला जात आहे, याची जाणीव जनतेला करू न दिली जाणार आहे.

Web Title: Independent Vidarbha people favorable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.