शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'मेनस्ट्रुअल कप'चा अकोल्यात वाढतोय टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:09 IST

अकोला: मासिक पाळीमध्ये परंपरागत पॅड सोडून ‘मेनस्ट्रुअल कप’ उपयोगात आणणाऱ्या महिलांची संख्या अकोल्यात दिवसेंदिवस वाढत असल्याची नोंद समोर येत आहे.

अकोला: मासिक पाळीमध्ये परंपरागत पॅड सोडून ‘मेनस्ट्रुअल कप’ उपयोगात आणणाऱ्या महिलांची संख्या अकोल्यात दिवसेंदिवस वाढत असल्याची नोंद समोर येत आहे. मेनस्ट्रुअल कप आर्थिक आणि वापरण्यास सोयीस्कर असल्याने याकडे महिलांचा कल वाढल्याची माहिती आहे.पूर्वीच्या तुलनेत आता महिलांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती झाली असून मासीक पाळीमध्ये ८० टक्के महिला पॅडचा वापर करीत आहेत. यामध्ये गाव-खेड्यातील महिलांचादेखील सहभाग आहे. पॅडचा वापर वाढल्याने पॅड निर्मितीची इंडस्ट्रीज देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मेडिकल्स स्टोअर्सपासून तर जनरल स्टोअर्सपर्यंत मोठ्या प्रमाणात पॅडची विक्री होते. पॅडचा वापरासोबतच त्यामुळे होणारे प्रदूषणही आता विक्राळ रूप धारण करीत आहे. सर्व्हिस लाइनमध्ये आणि कचरापेटीत टाकलेल्या पॅडमुळेदेखील मोठ्या प्रमाणात साथीचे आणि अन्य संसर्गजन्य आजार वाढत आहे. त्यामुळे पॅडला पर्याय शोधला जात होता. त्यात मेनस्ट्रुअल कपची निर्मिती झाली. महानगरातील महिलांसोबतच आता मोठ्या शहरातील प्रगल्भ विचारसरणीच्या महिलांमध्ये मेनस्ट्रुअल कप वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अकोल्यातही दहा टक्के महिला त्याचा वापर करीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.काय आहे मेनस्ट्रुअल कप?मेनस्ट्रुअल कप नेमका काय आहे, त्याचा वापर कसा करावा, तो कुठे मिळते, या सर्व बाबींची जनजागृती करण्यासाठी एका सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला असून, रविवार ३० जून रोजी अकोल्यात एका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील स्त्री रोग तज्ज्ञ आणि विविध संघटनेच्या महिला या शिबिरात प्रामुख्याने उपस्थिती दर्शविणार आहे. याचा लाभ अकोल्यातील महिलांनी घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

- पॅडच्या तुलनेत मेनस्ट्रुअल कप स्वस्त आणि वापरण्यास उत्तम आहे. यामुळे प्रदूषण होत नसून, एक मेनस्ट्रुअल कप किमान दहा ते पंधरा वर्ष उपयोगात आणता येतो. स्वच्छतेच्या दृष्टीने तो उत्तम असल्यामुळे बहुतांश महिला आता मेनस्ट्रुअल कपकडे वळत आहेत.-डॉ. वंदना बागडी, स्त्री रोग तज्ज्ञ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यWomenमहिला