शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्सचा वाढता धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 15:26 IST

अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्स झपाट्याने वाढत असल्याने सामान्य संसर्गजन्य उपचाराचीही क्षमता धोक्यात आली आहे.

अकोला : बदलत्या वातावरणासोबतच वाढत्या प्रदूषणामुळे अनेक आजार उद््भवत आहेत. यात संसर्गजन्य आजारांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या आजारांसोबतच अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्सचा धोकाही वाढत आहे. या रेजिस्टन्समुळे सामान्य संसर्गजन्य आजारांवरही औषधांचा काहीच परिणाम होत नाही. परिणामी, रुग्णांना दीर्घकालीन आजार, अपंगत्व किंवा मृत्यूही संभावण्याची शक्यता नाकारता येत नाही.बदलत्या वातावरणासोबतच व्हायरल इंफेक्शनचे आजार अनेकांना होतात. यामध्ये प्रामुख्याने बॅक्टेरिया, व्हायरस, परजीवी, फंगी यांच्यासारख्या त्वचेशी निगडित आजारांचे प्रमाण जास्त आहे. हे सूक्ष्मीजीव अँटिबायोटिक्स, अँटिफंगल्स,अँटिव्हायरल्स, अँटिमलेरिअल्स, अँथेलमिंटिक्स यांसारख्या अँटिमायक्रोबिअल औषधांच्या संपर्कात आल्याने त्यांचे रूप बदलते. अशा परिस्थितीत अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्सचा धोका संभवतो. म्हणजेच हे सूक्ष्मजीव औषधांना दाद देणे बंद करतात. औषधांना दाद न देणाऱ्या या सूक्ष्मजीवांना सुपरबग असेही म्हटले जाते. यामुळे औषधांचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही आणि इन्फेक्शन दूर होत नाही, त्यामुळे हे इन्फेक्शन इतरांनाही होण्याचा धोका वाढतो. अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्स झपाट्याने वाढत असल्याने सामान्य संसर्गजन्य उपचाराचीही क्षमता धोक्यात आली आहे.तर शस्त्रक्रियांमध्येही धोकाइन्फेक्शनला प्रतिबंध आणि त्यावर उपचारासाठी आवश्यक असलेल्या परिणामकारक अशा अँटिमायक्रोबिअलच्या वापराशिवाय अवयव प्रत्यारोपण, कॅन्सर केमोथेरेपी, मधुमेह व्यवस्थापन आणि हिप रिप्लेसमेंट, सिझेरियन डिलिव्हरी यांसारख्या महत्त्वाच्या शस्त्रक्रियांमध्ये धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.असा होतो अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्सचा प्रसारअँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्स सूक्ष्मजीव व्यक्ती, प्राणी, खाद्यपदार्थ आणि वातावरणात सापडतात. एका व्यक्तीमार्फत दुसºया व्यक्तीला किंवा प्राण्यांमार्फत मिळणाºया आहारातूनदेखील हे सूक्ष्मजीव पसरू शकतात. इन्फेक्शनला नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य प्रयत्न न करणे, पुरेशी स्वच्छता न राखणे, खाद्यपदार्थ योग्यरीत्या न हाताळणे आदी कारणांमुळे अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्सचा प्रसार होऊ शकतो.संसर्गजन्य आजारामध्ये अनेक रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवय औषधोपचार घेतात. अशा परिस्थितीत अ‍ॅँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्सचे परिणाम दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोका टाळण्यासाठी कुठलाही आजार असल्यास थेट तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शिवाय, इन्फेक्शन टाळण्यासाठी स्वच्छता राखणे गरजेचे आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य