रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; रुग्णालयात खाटाही रिक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:39+5:302021-05-30T04:16:39+5:30
अशी आहे रिक्त खाटांची स्थिती विभागा - एकूण खाटा - भरती रुग्ण - रिक्त खाटा ...

रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; रुग्णालयात खाटाही रिक्त!
अशी आहे रिक्त खाटांची स्थिती
विभागा - एकूण खाटा - भरती रुग्ण - रिक्त खाटा
आयसीयू - १६५ - १५७ -८
व्हेंटिलेटर - ९७ - ९२ - ५
ऑक्सिजन - २७० - १६८ - १०२
इतर खाटा - २०१ - ११२ - ८९
------------------------------
एकूण - ७३३ - ५२९ - २०४
जिल्ह्यातील सात दिवसातील स्थिती
दिनांक - रुग्ण - डिस्चार्ज
२३ मे - ४०८ - ६१५
२४ मे - २१४ - ४९४
२५ मे - २८८ - ५२८
२६ मे - ३३० - ५२१
२७ मे - २०५ - ५७४
२८ मे - २७० - ४३०
२९ मे - २२० - ४७८
-------------------
एकूण : १९३५- ३६४०
तिसऱ्या लाटेचा धाका कायम
आठवडाभरापासून रुग्णसंख्या वाढीचा वेग काही प्रमाणात घटला आहे, मात्र येत्या काही दिवसांत हा आलेख पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सध्या जरी रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला, तरी येत्या काही दिवसात हा आलेख पुन्हा उंचावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमित मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याची गरज आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले ही दिलासादायक बाब आहे, मात्र नागरिकांनी पुन्हा चूक करू नये. आणखी काही दिवस नियमांचे कडक पालन करावे. विशेषत: लहान मुलांना जपावे. सर्वांनीच त्रिसूत्रीचे पालन करावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला