लहान मुलांमध्ये वाढले सर्दी, तापाची लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:17 IST2021-04-17T04:17:24+5:302021-04-17T04:17:24+5:30

काय आहेत लक्षणे अनेक बालकांना सर्दी, ताप, खोकला, हगवण आदी लक्षणे आढळून येतात. बालकांमध्ये ही लक्षणे आढळताच पालकांनी त्यांना ...

Increased cold, fever symptoms in young children | लहान मुलांमध्ये वाढले सर्दी, तापाची लक्षणे

लहान मुलांमध्ये वाढले सर्दी, तापाची लक्षणे

काय आहेत लक्षणे

अनेक बालकांना सर्दी, ताप, खोकला, हगवण आदी लक्षणे आढळून येतात. बालकांमध्ये ही लक्षणे आढळताच पालकांनी त्यांना तत्काळ बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जाणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, बालकांमधील या समस्या नेहमीच्याच औषधांनीच सुटत असल्याने पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र या लक्षणांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

तर ‘कावासाकी’ आजाराचाही धोका

कुटुंबात कुणाला कोरोना होऊन गेल्यानंतर लहान बालकांमध्ये गोवराची लक्षणे आढळल्यास किंवा अंगावर चट्टे येणे, तोंड येणे, डोळे येणे आदी लक्षणे आढळल्यास बालकांना कावासाकी हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत पालकांनी तत्काळ बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

त्रिसूत्रीचे पालन करणे शिकवा

लहान मुलांना कोरोनासह इतर विषाणूजन्य आजारापासून बचावासाठी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे मार्गदर्शन पालकांनी करावे. यामध्ये प्रामुख्याने मास्क कसा घालावा, इतरांपासून सुरक्षित अंतर कसे राखावे तसेच वारंवार साबणाने स्वच्छ हात धुणे आदींचे मार्गदर्शन करावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, त्याचा परिणाम लहान बालकांवरही होत आहे. अनेक बालकांमध्ये सर्दी, ताप, खोकल्यासह हगवण आदी लक्षणे आढळून आली आहेत, मात्र पालकांनी यामुळे घाबरून न जाता योग्य काळजी घेण्याची गरज आहे. अशी लक्षणे दिसताच बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, तसेच घरात कुणाला कोरोना होऊन गेल्यावर बालकांमध्ये गोवर, तोंड येणे, डोळे येणे आदी लक्षणे आढळल्यास कावासाकी या आजाराचा धोका असून शकतो. त्यामुळे विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.

- डॉ. अनुप चौधरी, बालरोगतज्ज्ञ, मनपा आरोग्य विभाग, अकोला

Web Title: Increased cold, fever symptoms in young children