तापमानात वाढ!

By Admin | Updated: July 15, 2015 01:28 IST2015-07-15T01:28:47+5:302015-07-15T01:28:47+5:30

अकोल्याचे तापमान ३५ वरू न गेले ३७.३ अंशावर.

Increase in temperature! | तापमानात वाढ!

तापमानात वाढ!

अकोला : पावसाने प्रदीर्घ दडी मारली असून, तापमानातही वाढ झाल्याने अकोलेकरांना पावसाळ्य़ात उन्हाळय़ासारख्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. गत दोन दिवसात अकोल्याचे तापमान हे ३५ वरू न ३७.३ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. २४ जूनपासून पावसाने दडी मारल्याने जिल्हय़ात पाण्यासाठी हाहाकार आहे. पावसाअभावी शेतातील पिके अगोदरच कोमेजली असताना, तापमान वाढल्याने ही पिके करपली आहेत. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी तुषार सिंचनाचा वापर केला; पण पाणी दिलेल्या पिकांना तापमानाने फोडणी बसल्याने पिके पूर्ण करपली आहेत. ता पमानाचा पारा मात्र सतत वाढतच आहे. दिवसाच्या तापमानाने रात्रीच्या तापमानात वाढ झाली असून, ग्रामीण भागात उन्हाळ्य़ाची प्रचिती येत आहे. रात्रीच्या तापमानापासून सुटका करण्यासाठी अनेकांनी पुन्हा कुलर सुरू केले आहेत.

Web Title: Increase in temperature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.