‘लोकमत स्पोर्ट्स फेस्टिव्हल’चे थाटात उद्घाटन

By Admin | Updated: January 6, 2017 17:52 IST2017-01-06T17:52:45+5:302017-01-06T17:52:45+5:30

‘लोकमत’ समुहातर्फे आयोजित ‘लोकमत स्पोर्ट्स फेस्टिव्हल’चे आज सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले.

Inauguration of 'Lokmat Sports Festival' | ‘लोकमत स्पोर्ट्स फेस्टिव्हल’चे थाटात उद्घाटन

‘लोकमत स्पोर्ट्स फेस्टिव्हल’चे थाटात उद्घाटन

>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 6 - जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचे क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘लोकमत’ समुहातर्फे आयोजित ‘लोकमत स्पोर्ट्स फेस्टिव्हल’चे आज सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले.
वाशिम रोड स्थित प्रभात किड्स डे बोर्डिंग स्कुलच्या प्रांगणात वसविण्यात आलेल्या स्व. प्रभाताई नारे क्रीडानगरीत आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करून केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अरुण विधळे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, प्रभात स्कुलचे संचालक डॉ. गजानन नारे, लोकमत अकोला आवृत्तीचे सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल, निवासी संपादक रवी टाले, लोकमत समाचारचे प्रभारी अरुणकुमार सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Inauguration of 'Lokmat Sports Festival'