शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवा - रणजीत पाटील : जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 03:57 PM2018-03-30T15:57:42+5:302018-03-30T15:57:42+5:30

अकोला : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहीजे, असे सांगत शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्यां  विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी शुक्रवारी केले.

Inauguration of District Agriculture Festival in akola | शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवा - रणजीत पाटील : जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन

शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवा - रणजीत पाटील : जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्देकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विलास भाले होते. शेतीला पाणी आणि वीज मिळाल्यास शेतकरी कोणाचाही मोताद राहणार नाही, असही पालकमंत्री डॉ.पाटील यांनी सांगीतले. कृषी विभाग ‘आत्मा’ आणि कृषी विद्यापीठाने प्रयत्न करावे, असेही पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सांगीतले.


अकोला : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहीजे, असे सांगत शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्यां  विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी शुक्रवारी केले.
कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विलास भाले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक डॉ.सुभाष नागरे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती पुंडलीकराव अरबट, नगरसेवक हरिष आलीमचंदाणी, डॉ.हेमंत बोराडे, डॉ.उमेश ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड उपस्थित होते.
देशाचे पहिले कृषीमंत्री दिवंगत डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी विदर्भातील काळ्या मातीत मोेती पिकविण्याचे स्वप्न पाहीले होते, असे सांगत शेतकऱ्यांच्या हितासाठी संबंधित यंत्रणांकडून जास्तीत -जास्त काम कसे होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे पालकमंत्री म्हणाले. निसर्ग जेव्हा साथ देत नाही, तेव्हा खारपानपट्टयात एका पाण्याअभावी शेतकऱ्यां चे पीक जाते, अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी साडेचार हजार कोटींची दिवंगत नानासाहेब देशमुख बळीराजा कृषी संजिवनी योजना मुख्यमंत्र्यांनी सुरु केली असून, शेतीला पाणी आणि वीज मिळाल्यास शेतकरी कोणाचाही मोताद राहणार नाही, असही पालकमंत्री डॉ.पाटील यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक सुरेश बाविस्कर यांनी केले.संचालन बाळकृष्ण बिडवई व विकास पल्हाडे यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले.

‘सात-बारा’सोबतच जमीन आरोग्य पत्रिका द्या !
जमीनीत काय कमी आहे, यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती मिळावी, यासाठी दोन वर्षात प्रत्येक शेतकºयाला सात-बारा सोबतच जमीन आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड ) देण्यासाठी कृषी विभाग ‘आत्मा’ आणि कृषी विद्यापीठाने प्रयत्न करावे, असेही पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सांगीतले.

 

Web Title: Inauguration of District Agriculture Festival in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.