अकोला जिल्हा न्यायालयाच्या न्याय सेवा सदनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 19:19 IST2020-12-12T19:19:45+5:302020-12-12T19:19:55+5:30
Akola District Court विधी सेवा प्राधिकरणाच्या नवीन इमारतीचे शनिवारी सकाळी ११ वाजता ई उद्घाटन करण्यात आले.

अकोला जिल्हा न्यायालयाच्या न्याय सेवा सदनाचे उद्घाटन
अकोला : येथील वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे अर्थात न्याय सेवा सदन या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या नवीन इमारतीचे शनिवारी सकाळी ११ वाजता ई उद्घाटन करण्यात आले.
यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायालयअकोला येथील ‘न्याय सेवा सदन’ या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या नवीन न्यायालय इमारतीचा ई- उद्घाटन समारंभ शनिवार १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता झाला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष ए.ए. सय्यद यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड.ए. हक, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव अभय मंत्री यांची प्रमुख उपस्थिती हाेती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. शिवराज खोब्रागडे हे हाेते. या उद्घाटन सोहळ्यात जिल्हा व सत्र न्यायालय वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. आनंद ओ. गोदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव स्वरुपकुमार बोस यांच्यासह वकील व न्यायालनयीन अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले हाेते.