ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेचे बेमुदत धरणे
By Admin | Updated: March 29, 2016 02:23 IST2016-03-29T02:23:02+5:302016-03-29T02:23:02+5:30
बेलुरा येथील ग्रामरोजगार सेवकास पूर्ववत कामावर घेण्याची मागणी.

ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेचे बेमुदत धरणे
अकोला: पातूर तालुक्यातील बेलुरा येथील ग्रामरोजगार सेवकास गैरकायदेशीररीत्या कामावरून कमी करण्यात आले असून, त्यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे आणि यासंदर्भात चौकशी करून, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयामोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. बेलुरा येथील ग्रामरोजगार सेवक राहुल तुळशीराम इंगळे यांना कामावरून कमी करण्यात आले आहे; मात्र त्यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई गैरकायदेशीररीत्या असून, राजकीय द्वेषापोटी करण्यात आली आहे. त्यामुळे यासंदर्भात सखोल चौकशी करून ग्रामरोजगार सेवक इंगळे यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे आणि शासन निर्णयाची पायमल्ली करणारांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.