शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात १३ दिवसांत केवळ ३६८ बालकांचा शाळांमध्ये प्रवेश निश्चित

By atul.jaiswal | Updated: April 25, 2023 14:24 IST

प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याच्या १३ एप्रिलपासून जिल्ह्यात २५ एप्रिलपर्यंत केवळ ३६८ बालकांचा प्रवेश निश्चित झाला आहे. 

अकोला : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेत संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे खोडा निर्माण झाल्याने पालकांची चिंता वाढली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याच्या १३ एप्रिलपासून जिल्ह्यात २५ एप्रिलपर्यंत केवळ ३६८ बालकांचा प्रवेश निश्चित झाला आहे. 

आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या १९० शाळांमध्ये १९४६ जागा राखीव आहेत. या जागांसाठी ७११२ अर्ज प्राप्त झाले होते. राज्यस्तरावर काढण्यात आलेल्या सोडतीत जिल्ह्यातील १९२४ बालकांची निवड झाली आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १३ एप्रिलपासून सुरू होऊन प्रवेशासाठी २५ एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली होती. पहिल्या दिवसापासूनच आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश निश्चितीत खोडा निर्माण झाला आहे.   आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने जिल्ह्यातील निवड झालेल्या अनेक बालकांना अद्यापही प्रवेश निश्चित करता आलेला नाही. मंगळवार, २५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील केवळ ३६८ बालकांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत. अजूनही शेकडो बालके प्रवेशपासून वंचित असल्याने त्यांच्या पालकांना मुदतवाढीमुळे दिलासा मिळाला आहे.

८ मे पर्यंत मुदतवाढप्रवेशासाठीची २५ एप्रिल ही यापूर्वीची अंतिम मुदत जवळ आल्यानंतरही अनेक बालकांचा शाळा प्रवेश झाला नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा प्रवेशासाठी आता पुरेसा अवधी मिळणार असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा