धनादेश अनादरप्रकरणी कारावासाची शिक्षा
By Admin | Updated: May 8, 2014 00:54 IST2014-05-07T23:57:22+5:302014-05-08T00:54:28+5:30
धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयाने बुधवारी आरोपीस ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

धनादेश अनादरप्रकरणी कारावासाची शिक्षा
अकोला: धनादेश अनादरप्रकरणी न्यायाधीश हुसैन यांच्या न्यायालयाने बुधवारी आरोपीस ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
गीतानगरात राहणारे राजेश दुबे (४५) यांनी गीतानगरातील गुरुश्रीचंद पार्कमध्ये दोन दुकाने खरेदी करण्याचा व्यवहार सुशील राजारामसिंह ठाकूर याच्यासोबत केला होता. त्यासाठी त्यांनी सुशील ठाकूर याला ३.८0 लाख रुपये दिले. दरम्यान, राजेश दुबे यांनी व्यवहार केलेली दोन्ही दुकाने बँकेकडे गहाण ठेवलेली असल्याचे माहीत झाल्यावर त्यांनी सुशील ठाकूर याला बँकेकडे गहाण असलेली दुकाने सोडवून घेण्यास सांगितले; परंतु त्याने ही दुकाने बँकेकडून सोडून घेतली नाही. राजेश दुबे यांनी त्याला पैसे परत देण्याची मागणी केली. आरोपी सुशील ठाकूर याने दुबे यांना ३.८0 लाख रुपयांचा धनादेश दिला; परंतु हा धनादेश बँकेत अनादरित झाला. त्यामुळे दुबे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. बुधवारी न्यायाधीश हुसैन यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान आरोपी सुशील ठाकूर हा दोषी आढळून आल्याने न्यायालयाने त्याला ३ महिन्यांचा कारावास व धनादेशाची थकीत रक्कम व नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. तक्रारकर्त्याकडून अँड. एम. बदर यांनी काम पाहिले.