विनयभंग प्रकरणातील आरोपीस कारावास
By Admin | Updated: October 1, 2014 01:18 IST2014-10-01T01:18:18+5:302014-10-01T01:18:18+5:30
विनयभंग प्रकरणी ३ महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड.

विनयभंग प्रकरणातील आरोपीस कारावास
कोठा (तेल्हारा, जि. अकोला) : तेल्हारा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आ. मो. जोशी यांनी अडगाव येथील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी संतोष महादेव बोरे यास दोषी ठरवून ३ महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अडगाव येथील संतोष बोरे याने २१ मे २0११ रोजी त्याच गावातील एका महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी संतोष बोरे याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५४, ४५२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुरावा असल्याने न्यायालयाने आरोपीस ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी काम पाहिले.