आठ ठिकाणी दारू अड्डय़ांवर छापे

By Admin | Updated: May 31, 2016 02:02 IST2016-05-31T02:02:48+5:302016-05-31T02:02:48+5:30

पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात कारवाई

Impressions on liquor bars in eight places | आठ ठिकाणी दारू अड्डय़ांवर छापे

आठ ठिकाणी दारू अड्डय़ांवर छापे

अकोला : जिल्हय़ातील विविध ठिकाणांवर सुरू असलेल्या आठ दारू व जुगार अड्डय़ांवर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षकांनी सोमवारी छापेमारी केली. यामध्ये ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शेळके यांनी कर्मचार्‍यांसह दारू व जुगार अड्डय़ांवर छापा टाकला. यावेळी एका आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर बाश्रीटाकळी पोलिसांनी जुगार अड्डय़ावर टाकलेल्या छाप्यात एका आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २0 लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. पातूर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ५ लीटर गावठी दारू जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून, आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रियाज शेख यांनी शहरात केलेल्या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

Web Title: Impressions on liquor bars in eight places