शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात हळद लागवडीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:19 IST

अकोला : विदर्भातील वायगाव हळदीने जागतिक बाजारपेठेत मजल मारली आहे. या हळदीला मोठी मागणी आहे, भौगालिक नामांकन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी हळद लागवडीवर भर दिला आहे.

अकोला : विदर्भातील वायगाव हळदीने जागतिक बाजारपेठेत मजल मारली आहे. या हळदीला मोठी मागणी आहे, भौगालिक नामांकन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी हळद लागवडीवर भर दिला असून, शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही लागवड व काढणीसाठी विविध यंत्राची निर्मिती केली आहे.वर्धा जिल्ह्यातील वायगाव या नावाने संपूर्ण विदर्भात हळदीची ही जात प्रसिद्ध आहे. सेलम, राजापुरी, कृष्णा, फुले स्वरू पा इत्यादी हळदीच्या जाती प्रचलित आहे. तथापि वायगावची हळद ही अत्यंत कमी म्हणजे सात महिन्यात येणारी असून, या हळदीमध्ये कुरकमीन पिवळेपणा ६ ते ७ टक्के आहे. विशेष म्हणजे ही जात अत्यंत सुवासिक आहे. म्हणूनच आंतरराष्टÑीय बाजारपेठेत या हळदीची मागणी आहे. भौगालिक नांमाकंन मिळाल्यानंतर विदर्भात हळदीचे क्षेत्र जवळपास १५ हजार हेक्टरच्यावर पोहोचले आहे. या सर्व पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने वायगाव हळदीवर संशोधन सुरू केले असून, शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध यंत्राचा विकास केला आहे.मसाले पदार्थात हळदीचे प्रमाण २१.६ टक्के आहे. त्यामुळे हळद लागवडीचे प्रमाण वाढतच आहे. तसेच हळदीच्या तेलालाही मागणी आहे़ कृषी विद्यापीठाने तर उत्तम गुणधर्म असलेल्या हळदीच्या पानापासून तेल काढले आहे. या तेलाला सर्वाधिक मागणी राहील, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.  औषधी गुणधर्मऔषधी गुणधर्म असलेले हे तेल हृदयातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी उपयोगी आहे. रक्तशुद्धीकरण करते, रक्तातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करण्यास उपयुक्त आहे. कफ कमी करते, रोगप्रतिकारकशक्ती वाढविते, सुजीवर प्रभावी आहे, खोकला सर्दीवर जालीम उपाय करणारे आहे. जखम दुरुस्त करता येते. शरीरातील अंतर्गत जखमा द्रुतगतीने भरून निघतात़ परफ्यूममध्ये वापर करता येतो.

 वायगाव हळदीला भौगोलिक नामाकंन मिळाल्यानंतर लागवड वाढली असून, शेतकºयांना यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.डॉ. देवानंद पंचभाई,अधिष्ठाता उद्यान विद्याशास्त्र,डॉ.पंदेकृवि,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ