शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

रोगप्रतिकारक शक्ती अन् प्रतिबंधात्मक उपाय ‘कोरोना’वर प्रभावी औषध - डॉ. समीर लोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 6:05 PM

श्वसन चिकित्सा तज्ज्ञ तथा ‘फेलो आणि माजी सल्लागार श्वसन चिकित्सा, सीएमसी, वेल्लोर’डॉ. समीर दीपक लोटे यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून केले.

अकोला: जगभरात ‘कोरोना’चे संकट कायम आहे. अद्यापही संशोधकांना औषध निर्मितीत यश मिळाले नाही. अशा परिस्थितीत चांगली रोग प्रतिकारक शक्ती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी औषध ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी ‘कोरोना’ला घाबरून न जाता रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आणि वाषाणूंपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन श्वसन चिकित्सा तज्ज्ञ तथा ‘फेलो आणि माजी सल्लागार श्वसन चिकित्सा, सीएमसी, वेल्लोर’डॉ. समीर दीपक लोटे यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून केले.

नागरिकांनी ‘कोरोना’ला घाबरण्याची गरज का?योग्य खबरदारी घेतल्यास नागरिकांनी ‘कोरोना’ला घाबरण्याची गरज नाही. जगावर असा पहिलाच प्रसंग आला नाही. इतिहासात डोकावून बघितल्यास १९१८ मध्ये आलेल्या ‘स्पॅनिश फ्लू’मुळे यापेक्षाही भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्या तुलनेत कोरोना काहीच नाही. शंभरापैकी एक ते पाच लोक कोरोनामुळे प्रभावित झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नागरिकांनी एकदम घाबरून जाण्याची गरज नाही.‘कोरोना’ विषाणूंचा थेट फुप्फुसांवर ‘अटॅक ’ होतो का?‘कोरोना’ हा विषाणू काही नवीन नाही; पण सध्या त्याच विषाणूच्या कुटुंबातील ‘कोव्हिड-१९’ या विषाणूचा जलद गतीने प्रादुर्भाव होत आहे. हा विषाणूदेखील श्वसनाद्वारेच शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर तो फुप्फुसांमध्ये प्रवेश करतो आणि रुग्णाला निमोनिया होतो. सध्यातरी भारतात कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे एकदम घाबरून न जाता विशेष काळजी घेण्याची गरज आहे.‘कोरोना’चा धोका टाळण्यासाठी काय करावे?प्रतिबंधात्मक उपाययोजनेतून कोरोनाचा धोका टाळणे शक्य आहे; पण त्याचसोबत नागरिकांनी स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात.१) नियमित व्यायाम करावा.२) नियमित प्राणायाम व योग करावा.३) ‘सीजनेबल’ भाजीपाल्यांसह फळांचे सेवन करावे.४) विशेषत: ‘क- जीवनसत्व’ असणाऱ्या फळांचे सेवन करावे.‘कोरोना’चा सर्वाधिक धोका कोणाला?प्रामुख्याने ‘कोरोना’बाधित क्षेत्रातून आलेल्या किंवा ‘कोरोना’बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाºया व्यक्तींना याचा जास्त धोका आहे. शिवाय, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, (विशेषत: ५० ते ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती) अशा व्यक्तींनाही ‘कोरोना’चा धोका नाकारता येत नाही.‘कोरोना’विषयी नागरिकांची जबाबदारी काय असावी?नियमित किमान २० सेकंद साबणाने हात धुवावेत, शक्य असल्यास अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करावा, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे, प्रत्येकानेच मास्क लावण्याची गरज नाही.कोणत्या माध्यमातून ‘कोरोना’विषाणूची लागण होऊ शकते?साधारणत: शिंकेद्वारे किंवा खोकल्यातून कोरोना विषाणू एका व्यक्तीकडून दुसºया व्यक्तीपर्यंत पोहोचतो; परंतु याशिवाय इतर वस्तूसह प्लास्टिकच्या माध्यमातूनदेखील कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. प्लास्टिकवर जवळपास ७२ तास कोरोनाचे विषाणू राहत असल्याने त्याचा सर्वाधिक धोका आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाinterviewमुलाखत