राखमिश्रीत दूषित पाणी धरणात सोडणे तत्काळ बंद करा!
By Admin | Updated: January 8, 2015 00:49 IST2015-01-08T00:49:52+5:302015-01-08T00:49:52+5:30
बळीराम सिरस्कार यांचे मुख्य अभियंत्यांना निर्देश ; घटनास्थळाची पाहणी.

राखमिश्रीत दूषित पाणी धरणात सोडणे तत्काळ बंद करा!
अकोला : पारस येथील वीज निर्मिती प्रकल्पात तयार होणारी ज्वलनशील राख, १६ कोटी रुपये खचरून बांधलेल्या अँश पाँडमध्ये सोडण्याऐवजी, मन नदीवरील धरणात सोडण्यात येत आहे. ही बाब ह्यलोकमतह्णने उजेडात आणताच स्थानिक आमदार बळीराम सिरस्कार यांनी पारस येथील वीज निर्मिती केंद्रात जाऊन दूषित पाणी सोडण्यात येत असलेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्य अभियंत्यांना पाणी सोडण्याच्या कामात होत असलेल्या निष्काळजीबाबत चांगलेच धारेवर धरले आणि दुषित पाणी धरणात सोडणे बंद करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
बाळापूर तालुक्यातील पारस येथे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचा वीज निर्मिती प्रकल्प असून, यात दररोज शेकडो टन राख जमा होते. ही राख एका पाइपद्वारे कोळासा परिसरातील मोठय़ा भूखंडावर द्रव रूपात जमा केली जाते. द्रव रूपात असलेली ही राख या ठिकाणी गोळा करून, त्यातील पाणी वेगळे केले जाते. त्यानंतर उरलेल्या राखेची विक्री केली जाते. पाणी वेगळे करून राख साठविण्याकरिता १६ कोटी रुपयांचा अँश पाँड प्रकल्प येथे उभारण्यात आला आहे. त्या अँश पाँडपर्यंत पाइपलाइनद्वारे राख पोहोचविण्याकरिता मनारखेडमध्ये पंप हाऊस बांधण्यात आले आहे; मात्र वीज निर्मिती प्रकल्पातून निघालेली राख अँश पाँडपर्यंत पोहोचतच नाही. हे राखमि२िँं१्रूँं१त दूषित पाणी पंप हाऊसजवळून एका नालीद्वारे थेट मन नदीवर बांधलेल्या धरणात सोडण्यात येते असल्याचे लोकमतने बुधवारच्या अंकात प्रकाशित केले. तसेच या पाण्यात असलेल्या घातक रसायनांमुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य कसे धोक्यात येऊ शकते, याबाबतचा आरोग्य प्रयोगशाळेचा अहवालही प्रसिद्ध केला. प्रकल्पाच्या आत सुरू असलेल्या कामामध्ये होत असलेल्या निष्काळजीपणा लोकमतच्या माध्यमातून उघडकीस आल्यानंतर बुधवारी सकाळीच आमदार सिरस्कार यांनी प्रकल्पावर धाव घेतले. वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता रवींद्र गोहणे यांना सोबत घेऊन त्यांनी धरणात पाणी सोडण्यात येत असलेल्या भागाची पाहणी केली. धरणात पाणी सोडताना होत असलेला निष्काळजीपणा बघून त्यांनी मुख्य अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. पंप हाऊसचे काम तत्काळ पूर्ण करण्याची सूचना त्यांनी अभियंत्यांना केली. तसेच प्रक्रिया न करता पाणी धरणात सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी मुख्य अभियंत्यांना सूचना केली. वीज निर्मिती केंद्रातील दूषित पाणी धरणात सोडण्यापूर्वी प्रक्रिया होऊनच सोडणे आवश्यक आहे. प्रकल्पाच्या आत कोणते काम सुरू आहे, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष जात नाही. अडचणीच्या ठिकाणी असल्याने त्याकडे सहसा कुणी जाऊन बघत नाही. लोकमतच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आता कामाला गती येईल. त्याबाबत अभियंत्यांना सूचना दिली असल्याचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी सांगीतले.