भूमिगत गटारच्या ट्रीटमेंट प्लान्टची लवकरच निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 01:40 IST2017-04-08T01:40:55+5:302017-04-08T01:40:55+5:30
अकोला : अकोल्यातील भूमिगत गटार योजनेला नव्याने मान्यता मिळाली असून, यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटींच्या निधीतून ट्रीटमेंट प्लान्ट निर्मितीचे काम सुरू होणार आहे.

भूमिगत गटारच्या ट्रीटमेंट प्लान्टची लवकरच निर्मिती
अकोला : अकोल्यातील भूमिगत गटार योजनेला नव्याने मान्यता मिळाली असून, यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटींच्या निधीतून ट्रीटमेंट प्लान्ट निर्मितीचे काम सुरू होणार आहे.
यासंदर्भात अमरावती येथे मजीप्राच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. मजीप्राच्या प्रभारी अधीक्षक अभियंता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित होत्या. सुरुवातीला एकूण सात झोनमध्ये या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी ३५९ कोटींचा निधी अपेक्षित आहे. ट्रीटमेंट प्लान्ट आणि ट्रकमेनचे काम नदीपात्राजवळ सुरू करण्याचा विचार आहे. नदीचे दूषित पाणी शुद्ध करून पुन्हा ते वापरात आणण्यासाठी ट्रीटमेंट प्लान्ट काम करणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात भूमिगतसाठी १२० कोटींचा निधी मिळण्याची शक्यता असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची शक्यता महापालिकेचे जलप्रदाय अभियंता सुरेश हुंगे यांनी दिली. आघाडी शासनाच्या कार्यकाळात भूमिगतसाठी आलेला निधी परत जाण्याची वेळ आली. आता मात्र भाजपच्या सत्तेत भूमिगत गटार योजना अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.