चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, बालाजी सानप, रावसाहेब बुधवंत, दत्ता हिंगणे, योगेश, सुनील भाकरे आदी कर्मचारी गुरुवारी गस्तीवर असताना पिंपळखुटा नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतूक केल्याचे आढळून आले. ठाणेदार राहुल वाघ यांनी चालकाला रेती वाहतुकीचा परवाना असल्याचे विचारले असता, रेती वाहतुकीचा परवाना नसल्याचे समोर आले. टिप्पर (क्रमांक एम.एच. एक्स ७१७२) मध्ये दोन ब्रास रेती असा पाच लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करून टिप्पर चान्नी पोलीस स्टेशनमध्ये जमा केला. पोलिसांनी आरोपी हबीब खा महेमुद खा याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून पातूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची जमिनीवर सुटका केली आहे. पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहे.
रेतीची अवैध वाहतूक; टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:17 IST