बार्शीटाकळी तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:18 IST2021-02-13T04:18:15+5:302021-02-13T04:18:15+5:30
अकोला : बार्शीटाकळी परिसरात रेतीची अवैधरीत्या वाहतूक जोरात सुरू असल्याच्या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांनी शुक्रवारी ...

बार्शीटाकळी तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक जोरात
अकोला : बार्शीटाकळी परिसरात रेतीची अवैधरीत्या वाहतूक जोरात सुरू असल्याच्या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांनी शुक्रवारी छापेमारी केली. यावेळी रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारे तीन ट्रक पकडण्यात आले. त्यांच्या चालक व मालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बार्शीटाकळी तालुक्यात विना रॉयल्टी, तसेच विनापरवाना रेतीची जोरात वाहतूक सुरू असल्याची माहिती दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी तालुक्यातील विविध गावांत पाळत ठेवून रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारे तीन ट्रक (क्र. एमएच 04 डीके 8926 व एमएचबीयू 6102 आणि क्र. एमएच 28 बीएल 9494) जप्त केले. या तीन ट्रकमधील पाच ब्रास रेती जप्त करण्यात आली. हे तीनही ट्रक महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दहशतवादविरोधी कक्षाने वीस लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.