पातूर तालुक्यातील रेतीची अवैध वाहतूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:17 IST2021-01-22T04:17:40+5:302021-01-22T04:17:40+5:30
संतोषकुमार गवई लोकमत न्यूज नेटवर्क पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागात रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष ...

पातूर तालुक्यातील रेतीची अवैध वाहतूक!
संतोषकुमार गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागात रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. रेती घाटांचा लिलाव झालेला नसूनही तालुक्यातील जवळपास १८ रेती घाटांमधून भरदिवसा रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे.
तालुक्यातील आलेगाव, सस्ती, तुलंगा खुर्द, खेट्री, दिग्रस खुर्द, दिग्रस बुद्रुक, निमखेड, चरणगाव, विवरा, चान्नी, राहेर, अडगाव खुर्द, चांगेफळ, शिरपूर, तांदळी बुद्रुक, तांदळी खुर्द, बेलुरा खुर्द, बेलुरा बुद्रुक, वाडेगाव, पातूर भाग-३, पिंपळखुटा, वाहाळा बुद्रुक या गावातील रेती घाटांचा लिलाव अद्याप झालेला नाही. या संदर्भातील प्रस्ताव तहसील कार्यालयाने खनिकर्म विभाग, अकोला येथे पाठविला आहे. तालुक्यातून निर्गुणा, मन, विश्वमित्र, उतावळी, बोर्डी आणि तोरणा ह्या नद्या वाहतात.
अनेक महिन्यांपासून रेती माफियांकडून रेतीचे अवैध उत्खनन सुरुच आहे. तालुक्यातील जवळपास ८५ गावांमध्ये ओढे, नाल्यांमधून रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असून, लाखोंचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. (फोटो)
रेती माफियांची मुजोरी वाढली!
रेती माफियांकडून भरदिवसा नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. याबाबत वस्तूस्थितीदर्शक वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना धमक्या, मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.