गौण खनिजाची अवैध वाहतूक

By Admin | Updated: January 1, 2015 01:44 IST2015-01-01T01:44:47+5:302015-01-01T01:44:47+5:30

१ लाख ६५ हजार दंड वसूल; ८ वाहने जप्त; महसूल विभागाची कारवाई.

Illegal transport of minor minerals | गौण खनिजाची अवैध वाहतूक

गौण खनिजाची अवैध वाहतूक

अकोला: गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारी आठ वाहने पकडून, वाहन मालकांकडून १ लाख ६५ हजार ६00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अकोला तहसीलच्या भरारी पथकाने बुधवारी तालुक्यातील विविध ठिकाणी ही कारवाई केली.
गौण खनिजाची वाहतूक करणारी वाहने पकडून वाहनधारकांकडून दंड वसूल करण्याची मोहीम अकोला तहसील कार्यालयाच्या भरारी पथकामार्फत सुरू करण्यात आली आहे. परवाना नसताना गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून, अकोला तहसील कार्यालयाच्या भरारी पथकामार्फत तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारे चार ट्रक व चार ट्रॅक्टर, अशी आठ वाहने पकडण्यात आली. गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्‍या वाहन मालकांकडून १ लाख ६५ हजार ६00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्यामध्ये एमएच ३0 एल-३३५0, एमपी 0९ एचएफ-४0८४, एमएच ३0 बी-२६६२, एमएच ३0 एबी-५५७९, एमएच ३0 ए-९0८५, एमडब्ल्यूव्ही २५९७ व एमएच २९ ए-३९८0 इत्यादी क्रमांकाच्या सात वाहनांसह अन्य एक अशी एकूण आठ वाहने पकडण्यात आली. रेती, मुरुम व गिट्टीची अवैध वाहतूक करणारी वाहने पकडून दंड वसुलीची कारवाई करण्यात आली.
त्यामध्ये वाहनमालक अलोक शुक्ला यांच्या दोन वाहनांपोटी १ लाख १0 हजार ४00 रुपये, शेख कासम शे.पिरु ९ हजार २00 रुपये, विकास जाधव यांच्या दोन वाहनापोटी १८ हजार ४00 रुपये, मनीष गिरी ९ हजार २00 रुपये, मोहंमद शोएब ९ हजार २00 रुपये व गजानन बलोदे यांच्याकडून ९ हजार २00 रुपये, असा एकूण १ लाख ६५ हजार ६00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदारआराधना निकम, मंडळ अधिकारी टी.डी.सांगळे,बी.एस. थिटे व तलाठी एस.ओ. घाटोळ यांच्या पथकाने ही दंडात्मक कारवाई केली.

Web Title: Illegal transport of minor minerals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.