अडगावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:56+5:302021-07-07T04:23:56+5:30

गावात गेल्या दोन वर्षांपासून सर्रास वरली मटका, अवैध दारू विक्री खुलेआम सुरू असल्याची तक्रार वाॅर्ड नंबर ३ मधील नागरिकांनी ...

Illegal trade in Adagawa | अडगावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

अडगावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

गावात गेल्या दोन वर्षांपासून सर्रास वरली मटका, अवैध दारू विक्री खुलेआम सुरू असल्याची तक्रार वाॅर्ड नंबर ३ मधील नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आता तर गावातील मुख्य चौकात वरली मटका खेळणारे घरपोच सेवा देत आहेत. तसेच शाळेच्या मुलांचा जाण्या-येण्याच्या रस्त्यावरील बाजारपुरा परिसरात व पुरातन काळा मारोती मंदिर परिसरात दारू पिणारे व वरली मटका खेळणारे खुलेआम फिरताना दिसतात. यामुळे या परिसरातील जनतेला जगणे कठीण झाले आहे. बाजारपुरा परिसरातील नागरिकांच्या व शाळेतील विद्यार्थ्यांकरिता असलेल्या या रस्त्यावरील अवैध धंद्यांबाबत स्थानिक पोलीस चौकीला वारंवार सूचना दिल्यानंतरही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे गावात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील व वाॅर्ड नंबर ३ मधील खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे बंद न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Web Title: Illegal trade in Adagawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.