शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

गर्भपाताच्या गोळ्यांची अवैध विक्री; संजय जैन करायचा पुरवठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 13:57 IST

अकोला: गर्भपाताच्या गोळ्यांची अवैधरीत्या विक्री करणारी महिला संध्या रमेश चांदेकर (४0 रा. चवरे प्लॉट) आणि गोळ्यांचा पुरवठादार संजय धनकुमार जैन (५0 रा. आळशी प्लॉट) याला गुरुवारी अटक केली .

अकोला: गर्भपाताच्या गोळ्यांची अवैधरीत्या विक्री करणारी महिला संध्या रमेश चांदेकर (४0 रा. चवरे प्लॉट) आणि गोळ्यांचा पुरवठादार संजय धनकुमार जैन (५0 रा. आळशी प्लॉट) याला गुरुवारी अटक केली होती. रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारूख शेख (५२) यांनी गुरुवारी रात्री १0.३0 वाजताच्या दरम्यान दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सकांकडे गर्भपाताच्या गोळ्यांची अवैधरीत्या आणि विनापरवाना विक्री करणाºया व्यक्तींविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मीना सिवाल, औषधे निरीक्षक हेमंत मेतकर, विधी समुपदेशक शुभांगी खांडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने सापळा लावला. एका महिलेला बनावट ग्राहक बनवून गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणारी संध्या चांदेकर हिला संपर्क साधला. संपर्क साधल्याने या महिलेने जेस्टाप्रो नामक गोळ्यांची मागणी केली असता, संध्या चांदेकरने तिला टॉवर चौकात बोलाविले आणि या ठिकाणी तिला ८६७ रुपये किमतीच्या गोळ्यांच्या दोन स्ट्रीप आणून दिल्या आणि त्यासाठी तिने चार हजार रुपये घेतले. या महिलेने दबा धरून बसलेल्या पथकाला इशारा करताच महिलेला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर संध्या चांदेकर हिला गोळ्यांचा पुरवठा करणारा संजय धनकुमार जैन याला फोन करण्यास सांगितले. तिने त्याला फोन करून गोळ्यांच्या आणखी दोन स्ट्रीप घेऊन बोलाविले. संजय जैन हा गोळ्या चवरे प्लॉटमध्ये आल्यावर पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून गोळ्यांसह दोन दुचाकी असा एकूण ७६ हजार ८६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नसी अ‍ॅक्ट १९७१ चे कलम ५ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय एस.एम. इथापे, हेकाँ राजेश इंगळे यांनी केली.जैन हा बी.फार्म शिक्षितअटक केलेला संजय जैन हा बीफार्म शिक्षित असून, यापूर्वी तो मेडिकल एजन्सीमध्ये कामाला होता. त्यामुळे औषधांची चांगली माहिती आहे. त्याच्याकडे गर्भपात करण्याच्या गोळ्या बाळगण्याचा व विक्री करण्याचा परवाना नसतानाही तो हैदराबाद, मध्य प्रदेशातून गर्भपाताच्या गोळ्या आणून अवैधरीत्या गरजू महिला, तरुणींना अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये त्याचा पुरवठा करायचा. यासाठी त्याला संध्या चांदेकर सहकार्य करायची.

आरोपी महिला घरात करायची गर्भपात?आरोपी संध्या चांदेकर ही यापूर्वी आरोग्य केंद्रात काम करायची. नंतर तिने हे काम सोडल्यानंतर तिने एका खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम सुरू केले. कुमारिका माता, महिलांना हेरून ती संजय जैन याच्यामार्फत त्यांना गर्भपाताच्या गोळ्या पुरवायची. तिच्या घरी सापडलेल्या साहित्यावरून तरुणी, महिलांना घरी बोलावून गर्भपात करायची, असा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करणार आहेत.आरोपींनी स्त्री भ्रूणहत्या केल्याची शक्यतास्त्री भ्रूणहत्या प्रतिबंधक कायद्यामुळे गर्भलिंग परीक्षणावर निर्बंध आल्यामुळे गर्भपात दवाखान्यात येत नाहीत. त्यामुळे या आरोपींनी असे रुग्ण हेरून गर्भपात करून स्त्री भ्रूणहत्या केल्याची शक्यता नाकारता येत नाही. याचाही तपास पोलीस करणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी