शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुकानाचा बेकायदा ताबा; सीसीटीव्ही फुटेज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:31 IST

मोहम्मद अली रोड परिसरातील दुकानामध्ये बुधवारी रात्री उशिरा  दुकानाचे कुलूप तोडून गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी दुकानाचा बेकायदा ताबा केला. या  प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक  उमेश माने यांनी रविवारी या परिसरातील काही दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज  जप्त केले आहे. या फुटेजमध्ये बुधवारी रात्री घडविण्यात आलेला हैदोस कैद  झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देशहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांची कारवाई प्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोहम्मद अली रोड परिसरातील दुकानामध्ये बुधवारी रात्री उशिरा  दुकानाचे कुलूप तोडून गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी दुकानाचा बेकायदा ताबा केला. या  प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक  उमेश माने यांनी रविवारी या परिसरातील काही दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज  जप्त केले आहे. या फुटेजमध्ये बुधवारी रात्री घडविण्यात आलेला हैदोस कैद  झाल्याची माहिती आहे.  अब्दुल हबीब अब्दुल सलाम (६0) यांनी सिटी कोतवाली  पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मोहम्मद अली रोडवर हैदराबाद येथील  शब्बीरभाई कादरभाई यांचे बेरार सोडा फॅक्टरी नावाचे दुकान आहे. त्यांनी अब्दुल  हबीब यांच्या वडिलांना व्यवसायाकडे लक्ष देण्यासाठी मुखत्यार म्हणून नेमले होते.  वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अब्दुल हबीब हे दुकानाचे काम सांभाळत असतानाच  दुकानाचे मालक, अब्दुल हबीब आणि मूळ भाडेकरू या तिघांमध्ये दिवाणी  न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात खटला सुरू आहे.  दुकानाशी संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना मालकाने हे दुकान काही  लोकांना विकले. मूळ मालकाने व त्याच्यापासून मालमत्ता विकत घेणार्‍या व्यक्तीने  काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन बुधवारी रात्री उशिरा दुकानाचे कुलूप  तोडले आणि दुकानाचा बेकायदा ताबा घेतला. या प्रकरणाची तक्रार हबीब यांनी  केली असून, पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. या  प्रकरणाचा उलगडा ‘लोकमत’मध्ये झाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश  माने यांनी रविवारपासून चौकशीस प्रांरभ केला. सोबतच या परिसरातील  दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही  फुटेजची तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती  आहे.

हबीब यांचे बयान घेतलेअब्दुल हबीब यांची शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांनी चौकशी केली. माने  यांनी हबीब यांना कार्यालयात बोलावून घेत जातीने चौकशी केली. यामध्ये हबीब  यांनी केव्हा पोलीस तक्रार केली होती, त्यावर काय कारवाई झाली, यासह अनेक  बाबींसंदर्भात शहर पोलीस उपअधीक्षकांनी चौकशी केली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक