अवैध सावकारीची बनावट तक्रार: तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: May 3, 2017 01:25 IST2017-05-03T01:25:33+5:302017-05-03T01:25:33+5:30

अकोला : अवैध सावकाराविरुद्ध केलेल्या तक्रारीमध्ये बनावट कागदपत्रे जोडून फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Illegal lacquer complaint: Inquiry against three accused | अवैध सावकारीची बनावट तक्रार: तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध सावकारीची बनावट तक्रार: तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला : अवैध सावकाराविरुद्ध केलेल्या तक्रारीमध्ये बनावट कागदपत्रे जोडून फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बाभूळगाव जहागीर येथील विठ्ठल प्रल्हाद वक्टे याने २५ आॅगस्टला उपनिबंधक कार्यालयामध्ये देवीदास भीमराव उबाळे यांच्याविरुद्ध आणि ८ सप्टेंबर २०१६ रोजी राजेंद्र विठ्ठल वानखडे, अनिल हनुमानदास काबरा, नारायण दांदळे हे अवैध सावकारीचा व्यवसाय करीत असल्याचा आरोप केला. दरम्यान उपनिबंधक कार्यालयाकडे वक्टे याने बनावट कागदपत्रे जोडून तक्रार केल्यामुळे उपनिबंधक कार्यालयाने केलेल्या तपासणीदरम्यान प्रतिज्ञापत्र खरेदीची व करार केल्याची तारीख जुळत नसल्याचे स्पष्ट झाले, तसेच करारनाम्यावर स्वाक्षरी सुद्धा बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे विठ्ठल वक्टे याची तक्रार खारीज करण्यात आली. अवैध सावकारीविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीसोबत जोडलेली कागदपत्रे खोटे असल्यामुळे सुरेखा फुपाटे यांच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी विठ्ठल वक्टे, खिरपुरी येथील वासुदेव कवडकार आणि किनखेड येथील प्रकाश शेळके यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ (३४) नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Illegal lacquer complaint: Inquiry against three accused