अवैध बांधकाम पाडले!

By Admin | Updated: October 14, 2015 01:20 IST2015-10-14T01:20:45+5:302015-10-14T01:20:45+5:30

न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाची कारवाई.

Illegal construction was demolished! | अवैध बांधकाम पाडले!

अवैध बांधकाम पाडले!

अकोला : आरटीओ रोडवरील स्नेहल राहुल सावजी यांच्या मालकीच्या अपार्टमेंटचा अतिक्रमित भाग पाडण्याची कारवाई मंगळवारी दुपारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पार पाडली. यावेळी महापालिका आयुक्त अजय लहाने प्रामुख्याने उपस्थित होते. आरटीओ रोडवरील अपार्टमेंटच्या अतिक्रमणामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत तक्रारकर्ते हीरालाल किसनराव कुरई यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतू महापालिका प्रशासन अपार्टमेंटच्या अतिक्रमणाकडे दरुलक्ष करीत असल्याचे पाहून कुरई यांनी न्यायालयात धाव घेतली. महापालिका प्रशासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा सावजी यांनी अवैध बांधकाम केल्याचा मुद्दा कुरई यांनी उपस्थित केला. त्यावर संबंधित अतिक्रमित भाग पाडण्याचे आदेश न्यायालयाने जारी केले. त्यानुषंगाने मंगळवारी आयुक्त लहाने यांच्या उपस्थितीत सावजी यांच्या अपार्टमेंटचा अतिक्रमित भाग पाडण्यात आला. उर्वरित भाग स्वत:हून काढणार असल्याचे सांगत सावजी यांनी पंधरा दिवसांचा अवधी मागितला. आयुक्तांनी सावजी यांची विनंती मंजूर केली.

Web Title: Illegal construction was demolished!