सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू होता गर्भपाताचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:26 PM2019-07-23T12:26:48+5:302019-07-23T12:26:56+5:30

अकोला: न्यू भागवत प्लॉट परिसरातील ऋषी नर्सिंग होम केअर हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर रूपेश सुधाकर तेलगोटे याने गत सहा महिन्यांपासून शेकडो प्रेमी युगुल तसेच महिलांचे अवैधरीत्या गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.

Illegal Abortion practice was start for more than six months | सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू होता गर्भपाताचा गोरखधंदा

सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू होता गर्भपाताचा गोरखधंदा

Next

अकोला: न्यू भागवत प्लॉट परिसरातील ऋषी नर्सिंग होम केअर हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर रूपेश सुधाकर तेलगोटे याने गत सहा महिन्यांपासून शेकडो प्रेमी युगुल तसेच महिलांचे अवैधरीत्या गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.
अकोल्यातील काही हॉस्पिटलमध्ये कम्पाउंडरचे काम करणाऱ्या रूपेश सुधाकर तेलगोटे नामक बोगस डॉक्टरने न्यू भागवत प्लॉट परिसरात ऋषी नर्सिंग होम केअर हॉस्पिटल सुरू केले. त्याने पातूर येथील रहिवासी वैशाली संजय गवई हिला परिचारिका म्हणून कामावर ठेवले. तिच्या माध्यमातून अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्यांचा शोध घेणे आणि त्यांचे गर्भपात करण्याचा काळा धंदा या हॉस्पिटलमध्ये राजरोस सुरू केला. गर्भपातासाठी लागणाºया किट्स आणून देण्यासाठी रवी भास्कर इंगळे यालाही या साखळीत सामावून घेतले. या तिघांनी शहरातील काही नामांकित डॉक्टरांच्या माध्यमातून या हॉस्पिटलमध्ये अवैधरीत्या गर्भपाताचा सपाटाच सुरू केला. गत सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून गर्भपाताचा बाजार त्यांनी या हॉस्पिटलमध्ये मांडला होता. प्रशिक्षित डॉक्टर नसल्याने काही प्रेमी युगुलांमधील युवतींच्या जिवाला धोकाही निर्माण झाला आहे; मात्र तक्रार करण्यासाठी कुणी समोर न आल्याने अवैधरीत्या सुरू असलेले हे बोगस हॉस्पिटल आणि बोगस डॉक्टरचे प्रताप सुरूच होते.पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांनी या गंभीर प्रकरणाचा गोपनीयरीत्या अभ्यास करून तसेच डॉक्टरच्या डिग्रीसह हॉस्पिटलची नोंदणी व परवानग्यांची माहिती घेतली असता हे हॉस्पिटल अवैध असून, त्यामध्ये चालणारे प्रकार बेकायदेशीर असल्याचे उघड झाले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, विशेष पथकाची ही राज्यातील अशा प्रकारची पहिलीच कारवाई असल्याची माहिती आहे.
 
१५ दिवस चालली सूक्ष्म तपासणी
विशेष पथकाला बेकायदेशीर हॉस्पिटल तसेच बोगस डॉक्टरची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गत १५ दिवसांपासून या ठिकाणावर पाळत ठेवली. त्यानंतर संपूर्ण तांत्रिक अभ्यास करून त्यांनी या बोगस हॉस्पिटलवर कारवाई केली. विशेष पथकाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टर तसेच अवैधरीत्या गर्भपात करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.

रूपेश तेलगोटे  हॉस्पिटलमध्ये होता कामाला

रूपेश तेलगोटे हा शहरातील काही नामांकित हॉस्पिटल मध्ये कम्पाउंडर म्हणून कामाला होता, अशी माहिती समोर आली आहे. तेलगोटे हा डॉक्टरच नसल्याची माहिती असतानाही त्याला सहकार्य करणे आणि त्याच्याकडे गर्भपात करण्यासाठी रुग्ण पाठविणाºया डॉक्टरांवरही कारवाई होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title: Illegal Abortion practice was start for more than six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.