शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास बदलतील समीकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:26 IST

वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस आघाडीमध्ये समावेश झाल्यास जिल्ह्यातील आघाडीच्या जागा वाटपाची घडी विस्कळीत होणार आहे.

अकोला: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या काँग्रेसच्या पराभवात वंचित बहुजन आघाडीने घेतलेली मते कारणीभूत ठरल्याचे समोर आल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस आघाडीमध्ये समावेश झाल्यास जिल्ह्यातील आघाडीच्या जागा वाटपाची घडी विस्कळीत होऊन अनेकांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागणार आहे. सद्यस्थितीत या दोन्ही पक्षांची राजकीय ताकद पाहता जिल्ह्यातील पाचपैकी प्रत्येकी एक मतदारसंघ काँग्रेस ,राष्टÑवादीकडे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर धडा घेत मतविभाजन टाळण्यासाठी वंचितसोबत आघाडीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अकोला जिल्हा हा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची राजकीय राजधानी असून, सद्यस्थितीत काँग्रेसचा एकही आमदार जिल्ह्यात नसल्याने जागा वाटपात येथे वंचितची भूमिका वरचढ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात असलेल्या पाच मतदारसंघांपैकी बाळापूर हा मतदारसंघ वंचितच्या (भारिप-बमसं) ताब्यात आहे, त्यामुळे या मतदारसंघाबाबत वाटाघाटीचा प्रश्नच उद्भवणार नाही. उरलेल्या चार मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीत अकोला पूर्व या मतदारसंघात भारिप-बमसं दुसºया क्रमांकावर राहिला. विशेष म्हणजे मोदी लाटेतही येथे भारिपने ३०.३९ टक्के मते घेतली तर विजयी झालेल्या भाजपाला ३१.८४ टक्के मते होती. त्यामुळे साहजिकच या मतदारसंघावर वंचितचा दावा होणे अपेक्षित आहे. कदाचित राखीव जागा लढविण्याबाबत वंचित आग्रही राहिल्यास मूर्तिजापूर मतदारसंघाचा विचार केला जाऊ शकतो. येथेही गेल्या निवडणुकीत दुसºया क्रमांकाची मते घेतली होती. या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसची कामगिरी ही चवथ्या क्रमांकावर राहिली आहे. त्यामुळे बाळापूरसह मूर्तिजापूर व अकोला पूर्व अशा तीन मतदारसंघांवर वंचितचा दावा प्रबळ ठरू शकतो. असे झाल्यास काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसला अकोट व अकोला पश्चिम असे दोनच पर्याय शिल्लक राहू शकतात. त्यामुळे वंचितचा महाआघाडीत समावेश झाल्या निवडणुकीसाठी तयारी करीत असलेल्या काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसमधील इच्छुकांनाच उमेदवारीच्या संधीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. काँग्रेस सोबतच्या आघाडीबाबत अद्याप कुठलीही चर्चा कोअर टीममध्ये झालेली नाही. बाळासाहेब आदेश देतील तोच अमलात येईल. सध्या तरी आम्ही २८८ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे.- अशोक सोनोने, प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी काँग्रेसनेही उमेदवारी अर्ज बोलविण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. दुसरीकडे वंचितची काँग्रेससोबत आघाडी व्हावी अशा हालचाली पक्षस्तरावर सुरू झाल्या आहेत. अद्याप याबाबत अधिकृत चर्चा सुरू झाली नाही. चर्चेअंती याबाबत बोलता येईल. सध्या दोन्ही पक्ष आघाडीबाबत सकारात्मक आहेत.- डॉ. सुधीर ढोणे, प्रदेश प्रवक्ते, काँग्रेस 

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेसPoliticsराजकारणAkolaअकोला