शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’ वाढविल्यास राज्यभरात नियम तोडणार  - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:04 IST

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर येतील व लॉकडाऊनचे नियम तोडतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

अकोला : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनची मुदत ही वाढतीच आहे. सध्या सुरू असलेले लॉकडाऊन हे ३१ जुलै रोजी संपेल, या लॉकडाऊनमध्ये वाढ केल्यास वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर येतील व लॉकडाऊनचे नियम तोडतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.येथील विश्रामगृहावर सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक विवंचना वाढली आहे. या वर्गाला मदत करणारे दातेही आता थकले आहेत. त्यांचेही दातृत्व संपत आले आहे, त्यामुळे आणखी लॉकडाऊन वाढविल्यास गरिबांवर उपासमारीची वेळ येईल. कोरोनामुळे मृत्यू होण्याऐवजी उपासमारीनेच मृत्यू होतील, त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने आता लॉकडाऊन वाढवू नये. जर सरकारने लॉकडाऊन वाढवले तर वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून नियम तोडण्याचे आवाहन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.   सरकारने आता कोरोनाची भीती दाखविण्यापेक्षाा जनतेला कोरोनासोबत जगण्यासाठी तयार करण्याची गरज आहे. देशाची एकूणच अर्थव्यवस्था या कोरोनामुळे धोक्यात आली आहे, त्यामुळे लॉकडाऊन झाल्यास त्याचे नियम तोडण्यात आम्ही पुढे राहू, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी