योजनांचा निधी अखर्चित राहिल्यास अधिकारी जबाबदार!
By Admin | Updated: November 5, 2015 01:55 IST2015-11-05T01:55:40+5:302015-11-05T01:55:40+5:30
अकोला जिल्हा परिषद ‘सीईओं’चा इशारा; अधिका-यांना दिले पत्र

योजनांचा निधी अखर्चित राहिल्यास अधिकारी जबाबदार!
अकोला: जिल्हा परिषद सेस फंडातील योजना मार्गी लावून, निधी खर्च करण्यात यावा. सेस फंडातील योजनांचा निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभागप्रमुख अधिकार्यांना जबादार धरण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ ) एम. देवेंदर सिंह यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकार्यांना पत्राव्दारे दिला. जिल्हा परिषद सेस फंडातून समाजकल्याण, महिला व बाल कल्याण, कृषी, पशुसंवर्धन आणि शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांसाठी लाभार्थी याद्या आणि पुरवठा आदेश देण्याची प्रक्रिया रखडली आहे.ह्यमार्च एन्डिंगह्णला पाच महिन्यांचा कालावधी उरला असला तरी, जिल्हा परिषदेच्या कारभारात कोट्यवधींच्या योजना अधांतरीच अडकल्या आहेत. याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये २९ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी हा इशारा दिला. सेस फंडातून राबविण्यात येणार्या योजनांतर्गत चालू वर्षासह मागील वर्षीचा काही निधी अद्याप खर्च झाला नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद सेस फंडातून राबविण्यात येणार्या योजना योग्य प्रकारे राबवून, योजनांचा निधी खर्च करावा, निधी खर्च न झाल्यास किंवा विलंब झाल्यास, त्यासाठी विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार आहे, असा इशारा ह्यसीईओह्ण एम. देवेंदर सिंह यांनी सोमवारी महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, समाजकल्याण अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्यांना पत्राद्वारे दिला आहे.