मुंबइला जाऊन हीराे व्हायचेय म्हणून साेडले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST2021-08-25T04:24:43+5:302021-08-25T04:24:43+5:30
अकाेला : लहान वयात घरातील कलह तसेच माेठ्यांचे बाेलणे मनावर परिणाम करणारे असल्याने याच वयात ही मुले यापासून दूर ...

मुंबइला जाऊन हीराे व्हायचेय म्हणून साेडले घर
अकाेला : लहान वयात घरातील कलह तसेच माेठ्यांचे बाेलणे मनावर परिणाम करणारे असल्याने याच वयात ही मुले यापासून दूर जाण्यासाठी तर टीव्हीवरील हीराे-हीराेइनचे आकर्षण, त्यांचे माेठे बंगले व राहणीमान आपणही करावे म्हणून घर साेडून जात असल्याची माहिती आहे़ अशी घरून पळालेली मुले रेल्वे स्थानक तसेच बस स्थानकावर आढळत असल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे. अकाेल्यात एकाच घरातील तीन बहिणी तर एका घरातील दाेघे सख्खे चुलत भाऊ पळून जात असताना अकाेला रेल्वे स्थानकावर पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. तर काही मुलांना बस स्थानकावरून ताब्यात घेऊन कुटुंबीयांना साेपवले आहे. त्यामुळे घरातील कलह मुलांसमाेर हाेणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे़
सापडलेली मुले
२०१८ १५६
२०१९ १४२
२०२० १५२
२०२१ ८४
काेणाला बंगला-गाडीचे आकर्षण, तर काेणाला घरातील वादाचा कंटाळा
या लहान मुलांसमाेर घरातील वाद हाेत असल्याने त्यांना याचा कंटाळा येत आहे. तर याच मुलांना टीव्हीवरील हीराे-हीराेइन तर त्यांचे बंगले व राहणीमान याचे आकर्षण हाेत असल्याने नासमज असलेली ही मुले मुंबईला जाण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. या मुलांना रेल्वे स्थानक तसेच बस स्थानकावरून ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येत आहे़
घरातील कलहाने साेडले घर
सिंधी कॅम्प परिसरातून बेपत्ता असलेल्या मुलाची तक्रार झाल्यानंतर काही तासांतच त्याला अकाेला रेल्वे स्थानकावरून शाेधण्यात आले हाेते. या मुलाची चाैकशी केली असता घरातील कलहामुळे त्याने घर साेडल्याची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी कुटुंबीयांना बाेलावून त्यांची समजूत घातली. तर मुलगाही दिवसभर बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनाही त्यांची चूक कळली़
हिंगाेलीतील मुलगा अकाेल्यात आढळला
हिंगाेली येथील रहिवासी असलेला मुलगा अचानक घर साेडून निघून आला. नासमज असलेल्या या मुलाने बसने थेट अकाेला गाठून येथून पुढील प्रवास मुंंबईला करण्यासाठी रेल्वे स्टेशन गाठले. मात्र रेल्वे पाेलिसांना या मुलाची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याची चाैकशी करून मुलाला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले़
लहान मुले ही देवाघरची फुले आहेत. त्यांच्यासमाेर कुटुंबातील कलह टाळणे गरजेचे आहे. या मुलांसमाेर वाद हाेणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. तसेच त्यांना मित्रत्वाची वागणूक देऊन मुलांची प्रत्येक गाेष्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करावा़
- विलास पाटील,
पाेलीस निरीक्षक, अकाेला