पतीने केला पत्नीचा खून
By Admin | Updated: September 20, 2014 23:41 IST2014-09-20T23:41:20+5:302014-09-20T23:41:20+5:30
सिंदखेडराजा तालुक्यातील घटना, सासरकडील आरोपींना अटक.

पतीने केला पत्नीचा खून
सिंदखेडराजा (बुलडाणा) : स्थानिक कासारवाड्यात भाड्याच्या खोलीत राहणार्या पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना २0 सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी पतीने खुनाची कबुली दिली असून, सिंदखेडराजा पोलिसांनी पतीसह सासरकडील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
किनगावराजा येथील एकनाथ गणपत हरकळ याच्यासोबत जालना येथील कविता भगवान जाधव हिचा गत पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मागील काहीकाळापासून वारंवार पैशांची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळही केला जायचा. तिने याप्रकाराची माहीती तिच्या आईवडीलास याप्रकाराची माहिती दिली होती. मात्र शनिवारी सकाळच्या सुमारास आरोपी एकनाथने त्यांची पत्नी कविताचा गळा आवळून खून करून त्याने घटनास्थळावरून पोबारा केला.
दरम्यान, कविताला ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. पोलिसांनी पती एकनाथला किनगावराजा येथे अटक केली. तेव्हा आरोपी एकनाथने खुनाची कबुली दिली.