कंटेनरच्या धडकेने पती-पत्नी ठार

By Admin | Updated: March 13, 2015 01:37 IST2015-03-13T01:37:42+5:302015-03-13T01:37:42+5:30

औरंगाबाद नागपूर हायेवरील घटना

A husband and wife killed by the container's shock | कंटेनरच्या धडकेने पती-पत्नी ठार

कंटेनरच्या धडकेने पती-पत्नी ठार

किन्हीराजा (जि. वाशिम) : भरधाव कंटेनरने विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती, पत्नीचा मृत्यू झाल्याची १२ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद- नागपूर हायवेवरील किन्हीराजानजिक घडली.
किन्हीराजा येथून शेलुबाजारकडे गजानन सरोदे (५0) हे पत्नी गयाबाई सरोदे (४२) यांच्यासोबत मोटारसायकल बजाज एम -८0 (क्र. एम. एच. ३0 जी ६७१८) ने जात असताना शेलूबाजारकडून मालेगावकडे लोखंडी पोल घेऊन जाणार्‍या कंटेनरने ( क्र. सी. जी ७ सी.ए २३१४)े समोरासमोर जबर धडक दिली. यामध्ये गजानन सरोदे व त्यांच्या पत्नी गयाबाई चिरडल्या गेले. या घटनेची माहिती किन्हीराजा बस स्थानकावर असलेल्या युवकांना कळताच त्यांनी कंटेनरला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर कंटेनर घालण्याचा चालकाने प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पळून जाणार्‍या कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.

Web Title: A husband and wife killed by the container's shock