शेकडो वारकरी विशेष रेल्वे गाडीने पंढरपूरकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 13:16 IST2018-07-18T13:14:45+5:302018-07-18T13:16:39+5:30
अकोला : अमरावती-पंढरपूर विशेष रेल्वेगाडीने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अकोल्यातून शेकडो भाविक रवाना झालेत.

शेकडो वारकरी विशेष रेल्वे गाडीने पंढरपूरकडे रवाना
अकोला : अमरावती-पंढरपूर विशेष रेल्वेगाडीने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अकोल्यातून शेकडो भाविक रवाना झालेत. यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात भाविक विठ्ठलाचे नामस्मरण करीत होते.
मंगळवारी दुपारी दोन वाजता ही विशेष रेल्वेगाडी अमरावतीहून निघाली. ही रेल्वे बडनेरा, मूर्तिजापूर स्टेशनवरून भाविकांना घेत सायंकाळी पाच वाजता अकोल्यात पोहोचली. अकोला प्लॅट फार्म क्रमांक एकवर शेकडो भाविक या विशेष रेल्वेगाडीची प्रतीक्षा करीत होते. शेकडो महिला आणि पुरूष भाविक अकोल्यातून पंढरपूरकडे रवाना झालेत.
वारकऱ्यांच्या स्वागताचा अकोलेकरांना विसर....
दरवर्षी अकोल्यातून सर्वप्रथम जाणाºया पंढरपूर विशेष रेल्वेगाडीच्या इंजीनचालकाचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला जातो आणि प्लॅटफार्मवर प्रसाद वितरीत होतो; मात्र यंदा अकोलेकरांना या प्रथेचा विसर पडला. विश्व वारकरी सेनाच्या महिला उपाध्यक्ष आणि कीर्तनकार प्रतिभाताई गिरी, दिलीप गोसावी यांनी पुढाकार घेत पूजाअर्चा करून इंजीन पायलट प्रदीप बापारी आणि एस.एस.तायडे यांचा सत्कार केला.