मूर्तिजापूर तालुक्यात शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली;  अनेक गावांचा संपर्क तुटला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 07:47 PM2022-07-18T19:47:09+5:302022-07-18T19:48:17+5:30

Hundreds of hectares of land under water in Murtijapur taluka : पेढी पुर्णा, उमा, कमळगंगा व काटेपूर्णा नदीसह नाल्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Hundreds of hectares of land under water in Murtijapur taluka; Many villages lost contact | मूर्तिजापूर तालुक्यात शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली;  अनेक गावांचा संपर्क तुटला 

मूर्तिजापूर तालुक्यात शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली;  अनेक गावांचा संपर्क तुटला 

Next

-संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यात सतत दोन दिवस १७ व १८ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहत आहे.  तर हेच पुराचे पाणी काठावर असलेल्या शेतीत घुसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. त्याच बरोबर अनेक मार्ग बंद झाल्याने विविध गावांचा संपर्क तुटला आहे. तरी काही गावात घरांची पडझड झाल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली.
       तालुक्यातून वाहणाऱ्या पेढी पुर्णा, उमा, कमळगंगा व काटेपूर्णा नदीसह नाल्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. १७ जुलै पासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली. यामुळे नदी नाल्याला पुर येऊन पुराचे पाणी गावात व शेतीतीत शिरल्याने शेकडो हेक्टर शेतीचे व घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
 
या गावात झाले शेतीचे नुकसान

दातवी, गोरेगाव, समशेरपूर, गाजीपुर, लाईत, मंगरुळ कांबे, धामोरी, निंभा याशिवाय अनेक गावांच्या परीसरात शेतीतील उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर ८ महसूल मंडळात निंभा एका घराचे पुर्णतः २ किरकोळ, जामठी बु २, माना ७, मूर्तिजापूर १, लाखपुरी ३, शेलू बाजार १  अशा १६ घरांची पडझड झाली आहे.

Web Title: Hundreds of hectares of land under water in Murtijapur taluka; Many villages lost contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.