गुंठेवारी जमिनीच्या व्यवहारात दीड कोटी फस्त

By Admin | Updated: September 1, 2015 01:59 IST2015-09-01T01:59:01+5:302015-09-01T01:59:01+5:30

मोहता मिल परिसरातील ५ एकर गुंठेवारी जमिनीचे नियमबाह्य ले-आऊट प्रकरण; मनपात पंजाला कमळ आणि धनुष्यबाणाची साथ.

Hundreds of fare | गुंठेवारी जमिनीच्या व्यवहारात दीड कोटी फस्त

गुंठेवारी जमिनीच्या व्यवहारात दीड कोटी फस्त

अकोला: औद्योगिक कामासाठी आरक्षित असलेल्या मोहता मिल परिसरातील ५ एकर गुंठेवारी जमिनीचे नियमबाह्य ले-आऊट करून देण्याच्या बदल्यात महापालिके त काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने एकत्र येत तब्बल दीड कोटी रुपये फस्त केल्याची माहिती उजेडात आली आहे. हा सर्व व्यवहार शेगाव येथील हॉटेलमध्ये पार पडला असून, या कामासाठी मनपातील दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना त्यांचा मोबदला पोहोचता करण्यात आल्याची माहिती आहे. सत्ताधारी निष्क्रिय असल्याचा आरोप करीत मनपाच्या सभागृहात चप्पल फेकण्यापर्यं तची आंदोलने करायची. ओपन स्पेसवर अतिक्रमकांना कायमस्वरूपी हक्काची जागा देण्यासाठी तारणहार असल्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे मात्र सत्ताधार्‍यांना सोबत घेऊन कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारात हातमिळवणी करण्याचे धोरण विरोधी पक्ष काँग्रेसने स्वीकारल्याचे दिसते. औद्योगिक कामासाठी आरक्षित असलेल्या मोहता मिल परिसराची जागा दीड वर्षांपूर्वी जळगावच्या रायसोनी नामक इसमाने खरेदी केली. मध्यंतरी या जमिनीची विभागणी करण्यात येऊन वेगवेगळ्य़ा ग्राहकांना विक्री करण्यात आली. यातील पाच एकर गुंठेवारी जमिनीचे ले-आऊट करताना नियमानुसार १५ टक्के जागा ओपन स्पेस म्हणून राखीव सोडणे अपेक्षित होते. तसे न करता जमिनीचे ले- आऊट करण्यात आल्याची माहिती आहे. या व्यवहारात संबंधित चायपत्तीच्या मद तीला मनपात विरोधी पक्षाची भूमिका बजावणारे हात धावून आले. परंतु, हा व्यवहार एकट्याने करणे शक्य नसल्याची जाणीव होताच ह्यकमळह्ण आणि धनुष्यबाणाची मदत घेण्यात आली. नुकतीच बदली झालेल्या अधिकार्‍यांसह या तीन जणांनी हा सर्व व्यवहार शेगाव येथील हॉटेलमध्ये पार पाडला. या बदल्यात थोडे थोडके नव्हे तर दीड कोटी रुपये घेण्यात आल्याची माहिती आहे. यासंदर्भात मनपाकडे तक्रारींचा पूर साचण्याचे संकेत आहेत.

Web Title: Hundreds of fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.