शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

 हुक्का पार्टी भोवली; नऊ शिक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:08 IST

पातूर तालुक्यातील आठ, अकोला तालुक्यातील एका शिक्षकाला निलंबित करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला.

अकोला : विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्काराचे धडे देणारे शिक्षक सार्वजनिक ठिकाणी नशापान करताना आढळल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली; मात्र प्रशासकीय कारवाई अनेक महिने रखडली. अखेर मंगळवारी पातूर तालुक्यातील आठ, अकोला तालुक्यातील एका शिक्षकाला निलंबित करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. परभणी जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या शिक्षकावर कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले. शिक्षणाधिकारी वैशाली ठग रूजू झाल्यानंतर मुख्यालयासह निलंबनाचे आदेश दिले जाणार आहेत.अकोला-नांदेड महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये शिक्षकांनी नशापानासाठी हुक्का प्राशन केल्याची घटना पोलिसांच्या छाप्यात उघड झाली होती. त्यावेळी पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई केली. तर पुढील प्रशासकीय कारवाईसाठीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला. शिक्षण विभागाने त्यानुसार कारवाईचा प्रस्तावही तयार केला; मात्र त्यावर निर्णयच झाला नाही. त्यामुळे शिक्षण समिती, स्थायी समितीच्या सभेत वारंवार हा मुद्दाही उपस्थित झाला. कारवाईच होत नसल्याने हा मुद्दा मागे पडला होता. दरम्यान, याप्रकरणी पुन्हा एकदा कारवाईची मागणी पुढे आली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी कारवाईचा आदेश दिला.- निलंबित झालेले शिक्षकपातूर तालुक्यातील कोसगाव जिल्हा परिषद शाळेतील विजय भुतकर, अंधारसावंगी-संतोष राठोड, गावंडगाव- सुनील गवळी, गोंधळवाडी- सुखदेव शिंदे, मलकापूर (फॉ.)-दिनेश केकण, विवरा-संजय इंगळे, नांदखेड- अनिल दाते, कारला- गोपीकृष्ण येनकर, अकोला तालुक्यातील हिंगणा बारलिंगा येथील धीरज यादव यांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे, तर परभणी जिल्हा परिषदेत बदली झाल्याने महेश मानकरी या शिक्षकावर कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले.- सतत गैरहजर शिक्षकांना इशाराजिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्त चार शिक्षक गेल्या काही वर्षांपासून सतत गैरहजर आहेत. त्यांना १० जून रोजी म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यादिवशी उपस्थित न राहिल्यास एकतर्फी कारवाईचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला आहे. त्यासाठी पातूर तालुक्यातील सावरखेड शाळेतील राजेश विष्णूपंत तळोकार, अकोला तालुक्यातील खडका येथील विजय किसन तायडे, तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील संजय महादेव वानखडे, बाळापूर तालुक्यातील लोहारा येथील अरविंद हिरामण बुरुकले यांना नोटीस देण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकsuspensionनिलंबन