शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या महावितरणच्या ८१ कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता गोठविला!

By atul.jaiswal | Updated: June 2, 2018 13:31 IST

अकोला: मुख्यालयीन वास्तव्यास नसलेल्या महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे गोठविण्याच्या सूचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी मागच्या आठवड्यात केल्या होत्या. या सूचनेच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीअंती विदर्भातील तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे गोठविण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. याशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ...

ठळक मुद्देविदर्भातील तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे गोठविण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.यामध्ये अकोला परिमंडळातील बुलडाणा,  वाशिम व अकोला मंडळातील 26  कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ३५ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

अकोला: मुख्यालयीन वास्तव्यास नसलेल्या महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे गोठविण्याच्या सूचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी मागच्या आठवड्यात केल्या होत्या. या सूचनेच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीअंती विदर्भातील तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे गोठविण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. याशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्यावर कार्यवाही का करण्यात येऊ नये, या आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये अकोला परिमंडळातील बुलडाणा,  वाशिम व अकोला मंडळातील 26  कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना झाल्या असून, अनेक वीज कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसल्याने वीज यंत्रणेत होणारा बिघाड दुरुस्त करण्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या. या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता प्रादेशिक संचालकांनी मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता गोठविण्याच्या स्पष्ट सूचना केल्या होत्या आणि त्यासंदर्भातील अहवाल तीन दिवसांत प्रादेशिक कार्यालयाकडे सादर करण्याबाबतही सांगितले होते. यानुषंगाने महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या वर्धा मंडळातील सर्वाधिक १४ तर त्याखालोखाल नागपूर ग्रामीण, बुलडाणा व यवतमाळ मंडळातील प्रत्येकी १०, अकोला मंडळातील ९, अमरावती मंडळातील ८, वाशिम मंडळातील ७, गडचिरोली मंडळातील ५, नागपूर शहर मंडळातील ४, भंडारा मंडळातील ३ तर चंद्रपूर मंडळातील १ अशा एकूण ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता जून महिन्याच्या मासिक वेतनापासून गोठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या ८१ मध्ये वेतनश्रेणी दोनमधील ९, वेतनश्रेणी तीनमधील २४ तर वेतनश्रेणी चारमधील ५७ जणांचा समावेश आहे.३५ जणांना कारणे दाखवायाशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ३५ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यात नागपूर ग्रामीण मंडळातील १८, वर्धा मंडळातील १२, नागपूर शहर मंडळातील ४ तर यवतमाळ मंडळातील एका कर्मचाऱ्यांचा सहभाग असून, यात वेतनश्रेणी दोनमधील ३, वेतनश्रेणी तीनमधील ९ तर वेतनश्रेणी चारमधील २३ जणांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणAkola Zoneअकोला परिमंडळ