रविवारपासून हावडा-पुणे सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:17 IST2021-02-12T04:17:52+5:302021-02-12T04:17:52+5:30

गाडी क्र. ०२२८० अप हावडा-पुणे सुपरफास्ट ही विशेष गाडी १४ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत हावडा स्टेशन येथून दररोज ...

Howrah-Pune superfast special train will run from Sunday | रविवारपासून हावडा-पुणे सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी धावणार

रविवारपासून हावडा-पुणे सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी धावणार

गाडी क्र. ०२२८० अप हावडा-पुणे सुपरफास्ट ही विशेष गाडी १४ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत हावडा स्टेशन येथून दररोज २२.१० वाजता सुटेल आणि पुण्याला तिसऱ्या दिवशी ०७.०५ वाजता पोहोचेल. ही गाडी दररोज १९.४७ वाजता अकोला स्थानकावर येऊन १९.५० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

०२२७९ डाउन पुणे-हावडा सुपरफास्ट ही विशेष गाडी १६ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत पुणे येथून दररोज १८.३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी हावडा येथे ०३.५५ वाजता पोहोचेल. ही गाडी दररोज ०५.२५ वाजता अकोला स्थानकावर येऊन ०५.३० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

या गाडीला भुसावळ जंक्शन, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, भंडारा रोड, तुमसर, गोंदिया आदी ठिकाणी थांबा असणार आहे.

ही गाडी पूर्णपणे आरक्षित असून, त्यासाठी १२ फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर आरक्षण करता येणार आहे.

Web Title: Howrah-Pune superfast special train will run from Sunday