मुसळधार पावसामुळे घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:24 IST2021-09-08T04:24:20+5:302021-09-08T04:24:20+5:30

खेट्री : गेल्या २४ तासांपासून खेट्री परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खेट्री येथे अनेक घरांची पडझड ...

Houses collapse due to torrential rains | मुसळधार पावसामुळे घरांची पडझड

मुसळधार पावसामुळे घरांची पडझड

खेट्री : गेल्या २४ तासांपासून खेट्री परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खेट्री येथे अनेक घरांची पडझड झाली आहे.

खेट्री येथून वाहणाऱ्या मन नदी व नाल्यांना पूर आला होता. मुसळधार पावसामुळे खेट्री येथील फिरोज खा शफी खा, शेख शारिक शेख कलाम, अफरोज खा शफी खा, तसेच अनेक ग्रामस्थांच्या दगड-मातीच्या भिंतीमध्ये पाणी शिरल्याने पडझड झाली आहे. या वर्षी नदीला पहिल्यांदा पूर आल्याने गावातील ग्रामस्थांनी पूर पाहण्यासाठी पुलावर तुंबळ गर्दी केली होती. २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी-नाले तुडुंब वाहत आहेत. खेट्रीच्या मन नदीला पूर आल्याने गावातील ग्रामस्थ पूर पाहण्यासाठी पुलावर जमले होते. मुसळधार पावसामुळे घरांची पडझड झाल्याने सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Houses collapse due to torrential rains