वरली मटक्यावर धाड; आरोपी गजाआड
By Admin | Updated: May 17, 2014 20:14 IST2014-05-17T19:52:08+5:302014-05-17T20:14:11+5:30
उरळ पोलिसांनी वरली मटक्यावर धाड टाकून दोन आरोपींना अटक केली.

वरली मटक्यावर धाड; आरोपी गजाआड
उरळ (बाळापूर): स्थानिक पोलिसांनी शनिवारी बाळापूर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी वरली मटक्यावर धाड टाकून वरलीच्या साहित्यासह दोन आरोपींना अटक केली. पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, जुना अंदुरा येथील राहुल विठ्ठल उमाळे हा वरली मटका चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलसांनी छापा टाकून त्याच्याकडून वरली मटक्याचे साहित्य व रोख ७४० रुपये जप्त करून त्याला अटक केली. दुसर्या एका अन्य घटनेत उरळ पोलिसांनी हातरुण येथील संजय नामदेव उमाळे याच्याकडे छापा टाकला व त्याच्याकडून वरली मटक्याच्या साहित्यासह रोख ९६० रुपये जप्त करून त्याला अटक केली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.